कोल्हापूर-बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना गोळ्या घाला असे वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील यांनी केले होते. या वक्तव्यावर अनेक जण भीमाशंकर पाटील यांचा निषेध करत आहेत. या बाबत खासदार धैर्यशील माने यांनी फेसबुकला पोस्ट टाकून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीमधल्या एकाच्याही केसाला धक्का लागला तर गाठ सेनेशी - धैर्यशील माने - News about Maharashtra Integration Committee
बेळगामध्ये महाराष्ट्र एकिकरण समितीच्या लोकांब बद्दल भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा खासदार धैर्यशील माने यांनी फेसबुकला पोस्ट टाकून जाही निषेध व्यक्त केला आहे. यात त्यांनी शांतता भंग न करण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या 64 वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो " कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ". आजवर महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आजही महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे. अशा बेजबाबदार विधानांनी शांतता भंग करू नये. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. अज्ञानातून केलेल्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो, महाराष्ट्र एकीकरण असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.