महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापुरात दोन मुलींसह आईची पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या - पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या

शनिवारी सकाळी कामावर जातो, असे सांगून दोन मुलींसह त्या घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, संध्याकाळ झाली तरी घरी परतल्या नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली. मात्र, कुठेही या तिघी सापडल्या नाहीत. आज दिवसभर सुद्धा शोध लागला नव्हता. त्यानंतर संध्याकाळी पंचगंगा घाटावर तिघींचे मृतदेह आढळून आले.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Nov 8, 2020, 10:35 PM IST

Updated : Nov 8, 2020, 10:59 PM IST

कोल्हापूर - पंचगंगा नदीमध्ये एका महिलेने आपल्या दोन मुलींसह उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनेत्रा सावळकर असे महिलेचे नाव असून त्रिशा आणि खुशी अशी मृत मुलींची नावे आहेत. आज सायंकाळी तिघींचे मृतदेह येथील पंचगंगा नदीमध्ये आढळून आले. या घटनेची करवीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा सावळकर या वडणगे येथील इंदिरानगर याठिकाणी राहत होत्या. पाच वर्षांपूर्वी त्यांचे पती संतोष यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या सांगलीतील एका फर्मवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. सासू-सासरे आणि दोन मुलींचा सांभाळ एकट्या सुनेत्रा करत होत्या. त्यामुळे त्या काहीशा हतबल देखील झाल्याची चर्चा परिसरात होती.

संध्याकाळी पंचगंगा घाटावर तिघींचे मृतदेह दिसले

शनिवारी सकाळी कामावर जातो, असे सांगून दोन मुलींसह त्या घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, संध्याकाळ झाली तरी घरी परतल्या नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली. मात्र, कुठेही या तिघी सापडल्या नाहीत. आज दिवसभर सुद्धा शोध लागला नव्हता. त्यानंतर संध्याकाळी पंचगंगा घाटावर तिघींचे मृतदेह आढळून आले. परिसरातच राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ याबाबत करवीर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहांना बाहेर काढले. एकाच घरातील तिघींच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

दरम्यान, सुनेत्रा सावळकर यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारीच त्यांच्यावर होती. मात्र, त्यांनी आपल्या मुलींसह आत्महत्या का केली? याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून करवीर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Last Updated : Nov 8, 2020, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details