महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्यूदर २.९० टक्के, तर ६० वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणास प्राधान्य - कोेल्हापूर कोरोना अपडेट

कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्यूदर २.९० टक्के आहे. जिल्ह्यात ६० वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

mortality rate of corona patients in Kolhapur district is 2.90%
कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्यूदर २.९० टक्के, तर ६० वर्षावरील व्यक्तीचे लसीकरण करण्यास प्राधान्य

By

Published : May 28, 2021, 9:50 PM IST

कोल्हापूर -जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सुमारे तीन हजार इतकी आहे. यातील साडेचारशे मृत्यू इतर जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातील ५३ टक्के मृत्यू हे ६० वर्षावरील असून त्यातील ८० टक्के लोकांचे मृत्यू हे लसीकरण न झालेले आहेत. तुलनात्मक अभ्यास केल्यास कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्यू दर हा २.९० आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार बैठकीत दिली.

कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्यूदर २.९० टक्के, तर ६० वर्षावरील व्यक्तीचे लसीकरण करण्यास प्राधान्य

'५३ टक्के मृत्यू हे ६० वर्षापुढील नागरिकांचे' -

जिल्हाधिकारी दौलत पुढे म्हणाले, आतापर्यंत झालेल्या मृत्यू पैकी ५३ टक्के मृत्यू हे ६० वर्षापुढील नागरिकांचे आहेत. त्यातील ८० टक्के लोकांचा मृत्यू हा लस न घेतलेल्या लोकांचा आहे. नागरिकांनी सुरुवातीपासूनच लस घेण्यास टाळाटाळ केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या आव्हानाला सहकार्य केले असते तर मृत्यूचे प्रमाण कमी झाले असते, असेदेखील जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले.

जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार लोकांचा मृत्यू -

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. 450 लोकांचा मृत्यू हा इतर जिल्ह्यातील आहे. या तीन हजार पैकी चाळीस टक्के लोकांचा मृत्यू हा शेवटच्या तीन दिवसांतील आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्यूदर हा २.९० टक्के इतका आहे. पंजाब ,उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांचा मृत्यूदर हा ४ टक्क्यांच्या वर आहे. जिल्ह्यात दर दहा लाख लोकसंख्येच्या मागे ७०० लोकांचा मृत्यू आहेत. तोच आकडा इतर जिल्ह्यसह राज्यात ८०० ते १२०० इतका आहे. तर दहा लाख लोकसंख्या मागे २४ हजार बाधित कोल्हापुर जिल्ह्यात आहे. इतर जिल्ह्यात तोच आकडा २५ ते ४२ हजारपर्यंत असल्याची माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.

सुरुवात झाल्यास साठ वर्षाच्या वरील नागरिकांचा सर्व्हे -

आता लसीकरणाला सुरुवात झाल्यास आशा सेविकांच्या मार्फत पुन्हा एकदा साठ वर्षाच्या वरील नागरिकांचा सर्व्हे केला जाणार आहे. या माध्यमातून अशा नागरिकांची आरोग्य चाचणी, लसीकरण झाले की नाही? याची माहिती घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात साठ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यास प्राधान्य देणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

शहरातील तसेच ग्रामीण भागातील कोरोना चाचण्यांमध्ये वाढ -

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मात्र, जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला तर शहरातील तसेच ग्रामीण भागातील यापूर्वी कोरोना चाचण्या 5000 केल्या जात होत्या. गुरूवारपासून यांची संख्या वाढवून त्या दहा हजार इतक्या केल्या आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या अधिक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details