कोल्हापूर - आज कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण ( Kolhapur Airport Expansion ) संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे ( Collectors Office Kolhapur ) आयोजन करण्यात आले होते. यावेळी, कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेसह अन्य आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील ( MLA Satej Patil ) यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच राज्यात सत्तांतर होताच त्याचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणात दिसत असून खासदार धनंजय महाडिक ( MP Dhananjay Mahadik ) यांनी जिल्हा बँक तसेच गोकुळ ( Gokul ) मध्येही सत्तांतर होईल असा दावा केल्यानंतर याला सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जिल्ह्यातील सहकारवर सत्तांतराचा कोणताही परिणाम होणार नाही. जिल्ह्यातील नागरिक एका प्रवृत्तीच्या विरोधात जाऊन गोकुळ मध्ये सत्तांतर केले आहेत असा टोलाही त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांना लगावला. तसेच आम्ही सत्तेमध्ये असो किंवा नसो मात्र जनतेमध्ये सदैव असतो असेही ते यावेळी म्हणाले.
विमानतळ विस्तारीकरणासाठी बैठक - महाविकास आघाडी सरकारने कोल्हापूर विमानतळ विकासासाठी 212 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यातून सुमारे 1800 खातेदारांची 64 एकर जमिन संपादित करण्यात येणार आहे. या सोबतच यावेळी विमानतळ विस्तारीकरणासाठी ट्रान्समिशन, विद्युत व्यवस्था, अंतर्गत रस्ते आदी विविध विकास कामांचा आढावा सतेज पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. या बैठकीत आ.सतेज पाटील यांनी कोल्हापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग आणि धावपट्टी विस्तारीकरणाला देखील मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने राबवल्यास धावपट्टीचे विस्तारीकरण 23 मीटर पर्यंत करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे ज्या खातेदारांचे पैसे द्यावे लागतात ते तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही करा. अशा सूचना त्यांनी या बैठकीत केल्या.
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करा - आ. सतेज पाटील
एका प्रवृत्तीच्या विरोधात आमचे पॅनल निवडून आले - गेल्या काही दिवसापूर्वी धनंजय महाडिक यांनी गोकुळ मध्ये सत्तांतर होईल असा दावा केला होता मात्र याला माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल उत्तर दिले तर आज सतेज पाटील यांनीही धनंजय महाडिक यांना जोरदार टोला लगावला आहे. गोकुळमध्ये निवडणूक ( Gokul election ) लढवत असताना एका प्रवृत्तीच्या विरुद्ध ही निवडणूक लढवली गेली आणि जिल्ह्यातल्या स्वाभिमानी मतदारांनी एका प्रवृत्तीला गोकुळमध्ये निवडून न देता आमचे पॅनल निवडून दिलेला आहे त्यामुळे काही फरक पडणार नाही राज्यात सत्तांतर झाले या पार्श्वभूमीवर काहीतरी घडेल वगैरे असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीच असून सत्ता असो किंवा नसो आम्ही 24 तास लोकांसाठी उपलब्ध असतो त्यामुळे यामध्ये कुठलाही परिणाम होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
तर मंत्रिमंडळ विस्तारासाठी मोर्चा काढावा लागणार - राज्यात नवीन सरकार स्थापन हो तब्बल एक महिना पूर्ण झाला आहे मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये. यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा प्रश्न सर्वच विचारत आहेत मात्र आता आम्ही आणि जनता ही कंटाळली आहे येत्या आठ तारखेपर्यंत जर म्हणते मंडळाचा विस्तार झाला नाही तर विरोधी पक्षांना मोर्चा काढावाच लागेल अशी परिस्थिती आता निर्माण झाले असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे. तसेच जिल्ह्यातील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाचा विकास निधीला नवीन सरकारने स्थगिती दिली आहे. यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ हे उपमुख्यमंत्र्यांना भेटला आहे आणि विकास कामांना स्थगिती देऊ नका अशी विनंती केली आहे किमान शाहू महाराजांच्या विकास कामांना नवीन सरकारने स्थगिती द्यायला नको हवे होते असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा :Gokul Milk Union: जिल्हा बँकेसह गोकुळ'मध्ये सत्तांतर होणे अशक्य -हसन मुश्रीफ