महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nitesh Rane Health Checkup : नितेश राणेंची कोल्हापुरात होणार वैद्यकीय तपासणी; रुग्णालयाबाहेर बंदोबस्त वाढवला

संतोष परब हल्लाप्रकरणी (Santosh Parab Attack case) भाजप आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांची वैद्यकीय तपासणी कोल्हापुरातील सीपीआरमध्ये होणार आहे.

nitesh rane
नितेश राणे सीपीआर रुग्णालयात

By

Published : Feb 7, 2022, 3:14 PM IST

Updated : Feb 7, 2022, 3:34 PM IST

कोल्हापूर -संतोष परब हल्लाप्रकरणी (Santosh Parab Attack case) भाजप आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज आमदार नितेश राणे यांना कोल्हापुरात आणले जात आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी सीपीआर रुग्णालयामध्ये (CPR Hospital) होणार असल्याने ते रुग्णवाहिकेमधून ओरोसयेथून कोल्हापूरसाठी रवाना झाले आहेत.

सीपीआर रुग्णालयाबाहेरून प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
  • जामीन याचिकेवर मंगळवारी होणार सुनावणी -

कणकवली दिवाणी न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, म्हणून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या वकिलांनी आमदार राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला आहे. यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने जामीन अर्ज नाकारल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राणे यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआ रुग्णालयात दाखल केले जात आहे. कोल्हापुरातील कार्यकर्ते सकाळपासून सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते देखील कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

  • काय आहे प्रकरण?

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक निवडणूक सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. संतोष परब हे मोटरसायकलवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले.

  • सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध शिवसेना

कोकणामध्ये राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा हा संघर्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. तर राणे विरुद्ध शिवसेना असा सामना या निवडणुकीमध्ये रंगला होता. मात्र या निवडणुकीत अखेर राणे यांना मोठे यश मिळाले. यामध्ये राणे गटाच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. तसेच शिवसेनेचे हातात असलेली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक आता नारायण राणे यांच्या गटाकडे आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोकणामध्ये पुन्हा नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे.

Last Updated : Feb 7, 2022, 3:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details