कोल्हापूर : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी कोल्हापुरातील शहीद जवानाच्या बहिणीकडून राखी बांधून घेत रक्षाबंधन साजरा केला. गेल्या वर्षी काश्मिरात पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडीतील जवान ऋषीकेश जोंधळेंची बहिण कल्याणीच्या हातून राखी बांधून घेत लांडगे यांनी तिला भेट म्हणून एक दुचाकीही दिली.
EXCLUSIVE : शहीद जवानाच्या बहिणीकडून राखी बांधून घेत महेश लांडगेंचे रक्षाबंधन - rishikesh jondhale
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी कोल्हापुरातील शहीद जवानाच्या बहिणीकडून राखी बांधून घेत रक्षाबंधन साजरा केला. गेल्या वर्षी काश्मिरात पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडीतील जवान ऋषीकेश जोंधळेंची बहिण कल्याणीच्या हातून राखी बांधून घेत लांडगे यांनी तिला भेट म्हणून एक दुचाकीही दिली.
सामाजिक बांधिलकी जपली
13 नोव्हेंबर 2020 रोजी जम्मू काश्मीर येथे सीमेवर पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवान ऋषीकेश जोंधळे यांना वीरमरण आले होते. 2018 साली कोल्हापूर बीआरओ 6 मराठामध्ये ऋषीकेश भरती झाले होते. त्यानंतर बेळगाव येथे त्यांनी 9 महिन्यांचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर पहिलीच नेमणूक जम्मू काश्मीरमध्ये झाली होती. मात्र पाकिस्तानच्या हल्ल्यात अवघ्या विसाव्या वर्षी ऋषीकेश यांना वीरमरण आले. यात सर्वात दुःखद म्हणजे भाऊबीजेच्या दिवशीच 16 नोव्हेंबर 2020 रोजी ऋषीकेशची बहीण कल्याणी जोंधळे हिच्यावर आपल्या शहीद भावाच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची वेळ आली. त्यामुळे अवघ्या जिल्ह्यासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. याचीच जाणीव ठेवत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी रक्षाबंधनाला कल्याणाची भेट घेऊन तिच्याकडून राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्याचा निर्णय अनेक दिवसांपूर्वी घेतला होता. भावाची उणीव तर भरून निघणार नाही, मात्र तिचे अश्रू पुसण्याची आपली जबाबदारी असल्याचे म्हणत आमदार लांडगे यांनी कल्याणी जोंधळे यांच्या घरी जाऊन तिच्याकडून राखी बांधून घेतली.
कल्याणीला दुचाकी भेट
आमदार महेश लांडगे यांनी कल्याणीकडून राखी बांधून घेत ओवाळणी म्हणून एक दुचाकीही तिला भेट स्वरुपात दिली. प्रत्येकानेच अशा पद्धतीने शहीद जवानांच्या कुटुंबाचा आधार बनले पाहिजे अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
हेही वाचा -उरणमध्ये निसर्गाचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थीनींनी झाडांना बांधल्या राख्या