महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'...अशाने राज्य चालेल असे वाटत नाही'

गतवेळच्या भाजपच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविली. मात्र, त्या योजनेवर कॅगने आक्षेप नोंदवला असून एमआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. मात्र, ही चौकशी राजकीय आकसापोटी सुरू आहे, अशाने राज्य चालेल असे वाटत नसल्याचे आमदार चंद्रकांत पाटील म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

By

Published : Oct 15, 2020, 3:10 PM IST

Updated : Oct 15, 2020, 5:02 PM IST

कोल्हापूर - गतवेळच्या भाजपच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविली. मात्र, त्या योजनेवर कॅगने आक्षेप नोंदवला असून त्याची आता एमआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. सरकार तुमचे आहे तुम्ही चौकशी करू शकता आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. मात्र, ही चौकशी केवळ राजकीय आकसापोटी असून अशाने राज्य चालेल, असे वाटत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकात पाटील यांनी म्हटले आहे.

बोलताना आमदार पाटील

कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, धरण बांधणे शक्य नाही. त्यामुळे भाजप सरकारने जलयुक्त शिवार या योजनेची सुरुवात केली. ही योजना केवळ सरकारने दिलेल्या निधीवर चालली नाही. तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभाग लाभला आहे. या योजनानेनंतर 5 वर्षांमध्ये लोकांनीच मोठा फरक अनुभवला आहे. शेतकरीसुद्धा वर्षात दोन-दोन पीक घेऊ लागली. दुष्काळी भागातील अनेक ठिकाणी टँकरची गरज भासायची ती सुद्धा कमी झाली आहेत. मुळात जितकी कामे झाली त्यातील 99 टक्क्यांहून अधिक काम तपासण्यात आले नाही तरीही यावर आक्षेप घेत चौकशी करत आहेत. ही चौकशी केवळ राजकीय आकसापोटी सुरू आहे. त्यामुळे अशाने राज्य चालेल असे वाटत नसल्याचे सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणतात कोल्हापूरचा 'नादच खुळा'; कारण माहितेय का?

Last Updated : Oct 15, 2020, 5:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details