महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम हे राज्य सरकारचे; राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला गृहराज्यमंत्र्याचे उत्तर - राज ठाकरे उत्तरसभा ठाणे

राज ठाकरे ( Raj Thackeray Uttar Sabha thane ) यांनी काल ठाण्यात उत्तरसभा घेत महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. यावर राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. नियमात बसेल ते करणे आणि कायदा अबाधित ठेवणे ही आमची जबाबदारी असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील ( Satej Patil comment on Raj Thackeray Uttar Sabha thane ) म्हणाले.

Satej Patil comment on Raj Thackeray Uttar Sabha thane
राज ठाकरे उत्तरसभा सतेज पाटील प्रतिक्रिया

By

Published : Apr 13, 2022, 8:58 AM IST

कोल्हापूर -राज ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तरसभा ( Raj Thackeray Uttar Sabha thane ) घेत महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. तीन मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवा, अन्यथा संपूर्ण देशभरात हनुमान चालीसा लावू, असे ते म्हणाले आहेत. यावर राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. नियमात बसेल ते करणे आणि कायदा अबाधित ठेवणे ही आमची जबाबदारी असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील ( Satej Patil comment on Raj Thackeray Uttar Sabha thane ) म्हणाले.

प्रतिक्रिया देताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील

हेही वाचा -Kolhapur by-election : चंद्रकांत दादांनी भाजपच्या 'त्या' तिघांवर आता ईडी लावावी - पालकमंत्री सतेज पाटील

राज ठाकरे यांनी एक समान नागरी कायदा आणावा, तसेच लोकसंख्या वाढीवर कायदा आणावा ही देखील मागणी केली आहे. यावर बोलताना, समान नागरी कायद्याबाबत देशपातळीवर अनेक चर्चा सुरू आहेत. काँग्रेस पक्ष म्हणून आमचे काय धोरण आहे, हे आता सांगणे सयुक्तिक ठरणार नाही. तसेच, भारत हे जागतिक स्तरावर मोठी लोकसंख्या असलेले देश म्हणून पाहिले जाते. मात्र या लोकसंख्येवर काही करता येईल का, ते शक्य आहे का, हे पाहणे गरजेचे आहे. यावर सर्व पक्ष एकत्र येत सखोल चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे सतेज पाटील म्हणाले.

राज ठाकरे यांनी दिला गृह विभागाला अल्टीमेटम -3 मे पर्यंत भोंगे उतरावा नाहीतर हनुमान चालीसा सुरूच राहील. 3 तारखेला ईद आहे, माझे राज्य सरकारला आवाहन आहे. महाराष्ट्राचे स्वास्थ बिघडवायचे नाही. सर्व मशिदीवरील भोंगे खाली घ्या. नंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, असे राज ठाकरे यांनी गृह खात्याला डेडलाईन देऊन स्पष्ट केले. जितेंद्र आव्हाड यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते असेही ते म्हणाले.

टीकाकारांचे वाभाडे काढले : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर केलेल्या टीकेवर सत्ताधाऱ्यांसह अनेकांनी टीका केली होती. त्या सर्वांचा समाचार घेण्यासाठी, तसेच उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांची 'उत्तरसभा' मंगळवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतन समोरील डॉ. मूस रोडवर पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्यावरून टीकेचे आसुड ओढत टीकाकारांचे वाभाडे काढले.

शरद पवारांच्या बंगल्यावरील हल्ल्याबाबत संशय : राज ठाकरे यांनी ठाण्याच्या उत्तरसभेला पावणेआठ वाजता सुरुवात केली. यावेळी जनतेला संबोधित करताना आता इतकी काही आग लावणार नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी अग्निशमन दलाची गाडी पाहून केले. दरम्यान, माझा ताफा अडवणार आहात हे मला पोलिसांकडून कळाले. हे इंटिलिजन्स एजन्सीला कळाले. मात्र, शरद पवार यांच्या घरी हल्ला होणार, हे नाही कळाले, अशा शब्दात पोलिसांवर एकप्रकारे राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला.

माझा ट्रॅक बरोबरच : दरम्यान मला ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक बदलला, असा माझ्यावर आरोप केला. पण, मी ट्रॅक नाही बदलला. माझा ट्रॅक बरोबर असून ईडीची नोटीस आल्यावर मी ईडी कार्यालयात गेलो. मी कोणतेही पाप केले नाही. त्यामुळे, नोटीस कोणत्याही येवूद्या मी भीक नसल्याचे यावेळी राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -Kolhapur North By-Election Voting : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 60.09 टक्के मतदान

ABOUT THE AUTHOR

...view details