कोल्हापूर- भाजपचे अनेक नेते सद्या कोरोनाच्या या संकटात पीएम केअर्स फंडला मदत करून एकमेकांना चॅलेंज देत आहेत. खरंतर ही खरंच चांगली गोष्ट आहे पण काही नेत्यांनी मदतीसाठी दिलेली लिंकच खोटी असल्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीसुद्धा याबाबत ट्विट करून भाजप नेत्यांनी आपण काय करत आहोत याचे भान सोडू नये, असे म्हटले आहे.
पीएम केअर्स फंडची 'ती' लिंक खोटी; भाजप नेत्यांनी आपण काय करतोय याचे भान सोडू नये - गृहराज्यमंत्री - pm caare fund link froud
pmcaresfund.online ही लिंक खोटी असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील
शिवाय मदतीतसुद्धा फ्रॉड? म्हणत पक्षाच्या नेत्यांना आणि माजी मंत्र्यांनाच पीएम केअर्स फंड कोणता आहे माहीत नाही का, असा सवाल सतेज पाटील यांनी केला आहे. एव्हढेच नाही तर या फ्रॉड लिंकची तपासणी करू, असा इशारासुद्धा सतेज पाटील यांनी दिला आहे.
pmcaresfund.online ही लिंक खोटी असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.