महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Political Crises In Maharashtra : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर सुद्धा शिंदे यांच्यासोबत ? बंडखोरांच्या फोटोत झळकले यड्रावकरांचे भाऊ - आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर लेटेस्ट न्यूज

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे स्वतः मुंबईकडे रवाना झाले होते. त्यांच्यासोबत कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक हे होते. दोघेही एकत्रच मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र आता रात्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व बंडखोर आमदार एका फोटोत तसेच व्हिडिओमध्ये दिसले. त्यामुळे यड्रावकर सुद्धा शिंदे गटासोबतच असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

Political Crises In Maharashtra
बंडखोरांच्या फोटोत झळकले यड्रावकर यांचे भाऊ

By

Published : Jun 22, 2022, 12:18 PM IST

कोल्हापूर -आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर सुद्धा एकनाथ शिंदे गटासोबत गेल्याची शंका आता उपस्थित होत आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे बंधू एकनाथ शिंदे यांच्यासोबत रात्री हॉटेलमध्ये काढण्यात आलेल्या फोटोमध्ये पाहायला मिळाले. शिवाय आता सर्व बंडखोर आमदारांसोबतच गुवाहाटी येथे गेले आहेत. त्यामुळे यड्रावकर हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून शिंदे शिवसेनेसोबत असलेल्या काही अपक्ष आमदारांना सुद्धा आपल्याकडे वळविण्यात यशस्वी झाल्याचे दिसत आहे.

राजेंद्र पाटील-यड्रावकर मुंबईत मात्र भाऊ गुहाहाटीमध्ये -मंगळवारी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे स्वतः मुंबईकडे रवाना झाले होते. त्यांच्यासोबत कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक हे होते. दोघेही एकत्रच मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र आता रात्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व बंडखोर आमदार एका फोटोत तसेच व्हिडिओमध्ये दिसले. त्यामध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू सुद्धा दिसले आहेत. त्यामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर जरी मुंबईत असले, तरी त्यांचे बंधू मात्र बंडखोर आमदारांसोबत गुहाहाटी येथे आहेत. त्यामुळे यड्रावकर सुद्धा शिंदे गटासोबतच असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

कोल्हापूरातील दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत -राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर हे सुद्धा मंगळवारी गुजरात येथील सुरतमध्ये होते. त्यामुळे त्यांची भूमिका यातून स्पष्ट झाली आहे. दुसरीकडे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सुद्धा कोल्हापुरातील शिरोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. ते अपक्ष निवडून आले आहेत. मात्र सत्तास्थापनावेळी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देत सेनेत गेले. त्यानंतर त्यांना शिवसेनेकडून राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र आज एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये कोल्हापुरातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेल्या आबिटकर यांच्यासोबत ज्यांनी सत्तास्थापनेपासून हातात शिवबंधन बांधले, त्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांचाही समावेश असल्याची शंका उपस्थित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details