कोल्हापूर : कोरोना काळात रुग्णांची झालेली हेळसांड ही अत्यंत गंभीर बाब आहे. असे सांगत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार ( Bharati Pawar Angry In Kolhapur )यांनी कोल्हापुरात आरोग्य विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतले. जिल्हा शल्यचिकित्सक ( Kolhapur Civil Surgeon ) यांच्याकडून आलेल्या हर्षल वेदक, सीपीआर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचे डीन ( Kolhapur Medical Collage ) प्रदीप दीक्षित आणि जिल्हा आरोग्य अधिकारी ( Kolhapur District Health Officer ) यांच्यात समन्वय नसल्याच्या मुद्द्यावरून या तीनही अधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात ( Kolhapur Government Rest House ) झालेल्या बैठकीत मंत्री पवार यांनी खरडपट्टी काढली आहे.
मी सहन करणार नाही
कोरोना काळात इतर आजार असणाऱ्या रुग्णांची हेळसांड झाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता. याची तक्रार भाजपाचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंद गुरव यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे केली. या तक्रारीवरून अधिकाऱ्यांना चांगलीच समज दिली. रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर मी सहन करणार नाही अशा शब्दात भारती पवार यांनी कोल्हापूरच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सुनावले. केंद्राकडून येणाऱ्या निधी हा आरोग्य विभागासाठीच शंभर टक्के खर्च झाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच झापले
कोरोना काळात सीपीआर हॉस्पिटलमध्ये ( CPR Hospital Kolhapur ) फक्त कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी ठेवले गेले होते. या दरम्यान कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांची मोठी हेळसांड ( Kolhapur Non Covid Patients ) झाली आणि त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात अनेक रुग्ण दगावले. यामुळे भारती पवार यांनी या तीनही अधिकाऱ्यांना समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना केल्या. तसेच कामाकडे दुर्लक्ष केल्यास कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक ( Ex MP Dhananjay Mahadik ) , भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासमोरच मंत्री भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना झापलं आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोरोना काळात साहित्य खरेदीत घोटाळा
राज्य सरकार जेव्हा मागणी करते त्यावेळी त्यानुसार केंद्र सरकार मदत देत असते. मात्र मदत मिळाल्यानंतर राज्य सरकारची जबाबदारी असते ते काम पूर्ण करून घेणे. मात्र जर असा भ्रष्टाचार होत असेल तर याबाबत राज्य सरकारने त्वरित दखल घेतली पाहिजे. मी सुध्दा याबाबत चौकशी करेन, असे भारती पवार यांनी सांगितले.