कोल्हापूर - ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू राष्ट्रवादीच्या त्या सभेमध्ये नव्हता आणि यापुढेही कधी असणार नाही. शिवाय अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे जलसंपदामंत्री यांनी म्हटले. ते कोल्हापुरात बोलत होते. सांगलीतील इस्लामपूर येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी ( MLA Amol Mitkari ) यांनी आपल्या भाषणात ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप ब्राह्मण समाजाने केला आहे. शिवाय ब्राह्मण समाज त्यांच्या विरोधात कारवाईसाठी आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, ही सभा सांगलीत झाली होती शिवाय मी त्या व्यासपीठावर होतो. त्यामुळे ब्राह्मण समाजाची दिलगिरी व्यक्त ( Minister Jayant Patil apologized ) करतो.
Minister Jayant Patil Apologized : जयंत पाटलांनी मिटकरी यांच्या 'त्या' विधानाबाबत व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले... - राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी ( MLA Amol Mitkari ) यांनी आपल्या भाषणात ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप ब्राह्मण समाजाने केला आहे. शिवाय ब्राह्मण समाज त्यांच्या विरोधात कारवाईसाठी आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, ही सभा सांगलीत झाली होती शिवाय मी त्या व्यासपीठावर होतो. त्यामुळे ब्राह्मण समाजाची दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात त्यांनी दिलगिरी व्यक्त ( Minister Jayant Patil apologized ) केली.
काय म्हणाले जयंत पाटील ? -कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील ( Minister Jayant Patil ) यांनी कोल्हापूरातील सर्वच कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि पक्षातील काही अडचणी तसेच समस्या असतील तर त्याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. अमोल मिटकरी ( MLA Amol Mitkari ) यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आणि त्यानंतर ब्राह्मण समाज आक्रमक झाल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, आजपर्यंत आम्ही कधीच ब्राह्मण समाजाची भावना दुखावण्याचा प्रयत्न केला नाही. आज राज्यभर आमच्या संवाद सभा होत आहेत. अनेक ठिकाणी ब्राह्मण समाजाचे अनेकजण आमचे स्वागत करत आहेत. मात्र, बुधवारी (दि. 20 एप्रिवल) सभेत आपल्या भावना दुखावण्याचा कोणताही उद्देश आमचा नव्हता. त्यामुळे जरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असेही जयंत पाटील ( Minister Jayant Patil ) म्हणाले. शिवाय मी सुद्धा त्यांनी केलेल्या त्या विधानानंतर त्यांनी भाषण थांबविण्याची विनंती केली होती. मात्र, ते त्यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे. खरतर त्यांनी त्यांच्या भाषणात ब्राह्मण समाजाचा उल्लेख केला नाही. मात्र, ज्या पद्धतीने ते बोलले ते योग्य नव्हते असेही पाटील म्हणाले.