कोल्हापूर -जिथे आम्ही गुण्या गोविंदाने राहतो तिथे तेढ निर्माण करण्याचा ओवेसी प्रयत्न करत आहेत बाकी काही नाही. शिवाय आत्ताच महाराष्ट्रात येऊन हे करायची काय गरज होती, असे म्हणत यापुढे जर तेढ निर्माण होईल असे काही घडले, तर त्यांच्यावर महाराष्ट्र बंदी घालण्याचा आम्ही विचार करू, अशी प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ( Rural Development Minister Hasan Mushrif ) यांनी दिली आहे. एएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी ( AMIM leader Akbaruddin Owaisi ) यांनी औरंगजेबच्या कबरीवर ( Aurangzeb graveControversy ) जाऊन फुले आणि चादर चढवून प्रार्थना केली होती. त्यानंतर मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Aurangzeb Grave Controversy :...तर अकबरुद्दीन ओवैसींवर महाराष्ट्र बंदीचा विचार करु - हसन मुश्रीफ - ओवैसींवर महाराष्ट्र बंदीचा विचार करु
जिथे आम्ही गुण्या गोविंदाने राहतो तिथे तेढ निर्माण करण्याचा ओवेसी प्रयत्न करत आहेत बाकी काही नाही. यापुढे जर तेढ निर्माण होईल असे काही घडले, तर त्यांच्यावर महाराष्ट्र बंदी घालण्याचा आम्ही विचार करू, अशी प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ( Rural Development Minister Hasan Mushrif ) यांनी दिली आहे. एएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी ( AMIM leader Akbaruddin Owaisi ) यांनी औरंगजेबाच्या कबरीवर ( Aurangzeb grave Controversy ) जाऊन फुले आणि चादर चढवून प्रार्थना केली होती.
काय आहे प्रकरण ? :चार दिवसांपूर्वी एएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबच्या कबरीवर जाऊन फुले आणि चादर चढवून प्रार्थना केली होती. त्यांच्यासोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील सुद्धा होते. त्यांच्या या कृतीनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन करून त्यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला जात आहे. याबाबतच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून हा केवळ तिथे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत बाकी काही नाही असे म्हटले आहे. शिवाय तुम्ही निजामांच्या राज्यातील आमच्या येथे गुण्या गोविंदाने नंदणाऱ्या राज्यात तुमचे काय काम म्हणत जर यापुढे तेढ निर्माण करण्याबाबत काही घडले तर शासन म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्र बंदी घालण्याबाबत विचार करू, असेही मुश्रीफ म्हणाले.