कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलने विजय खेचून आणत आपली सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत सुरवातीपासूनच अनेक नाट्यमय गोष्टी घडल्या आहेत. 3 जागेवर ठाम असलेल्या शिवसेनेने मित्र पक्षांना सोबत घेऊन नवीन पॅनल उभा करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला थेट आव्हान देत निवडणुकीत 4 जागांवर शिक्कामोर्तब केला. या नंतर आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात येऊन जिंकलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार विनय कोरे यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता कोणत्या तालुक्यातून किती मतदान झाले. याची माहिती घेऊन आमदार कोरे यांच्या आरोपांना उत्तर देण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
हेही वाचा -Kolhapur Omicron : कोल्हापुरात ओमायक्रॉनचे 4 नवे रुग्ण; महापालिकेतर्फे उपयोजना सुरू
केडीसीसी बँकेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच कार्यकर्त्यांनी कोरोना नियम धाब्यावर बसवत केलेला जल्लोष हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. अशा वेळेस मंत्री किंवा नेते तरी काय करणार? असे देखील मुश्रीफ म्हणाले.
आमदार विनय कोरे यांनी केलेल्या आरोपांचे विश्लेषण नंतर करू
सत्तारूढ आघाडीचे सर्व नेते प्रामाणिक राहिले असते तर, विरोधी आघाडीतील एकही उमेदवार निवडून येऊ शकला नसता. मात्र, ज्यांनी हे पाप केले, त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा आमदार विनय कोरे यांनी दिला होता. यावर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी, ज्यांचा पराभव झाला याचा अर्थ ते उमेदवारच मतदारांना मान्य नव्हते. प्रक्रिया आणि पतसंस्था या दोन्ही गटातील आमचा पराभव हा धक्कादायक आहे. परिवर्तन आघाडीचे उमेदवार ज्या गटामध्ये विजयी झालेत त्यांचा त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासूनचा संपर्क होता. मात्र, आमदार कोरेनी दिलेली प्रतिक्रिया पाहता आपण त्याचे विश्लेषण करू. कोणत्या तालुक्यातून किती मतदान झाले. याची माहिती घेऊन आमदार कोरे यांच्या आरोपांना उत्तर देण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
अध्यक्षपदाचा अजून निर्णय नाही, बैठक घेऊन सर्वानुमते निर्णय