कोल्हापूर - शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेत राष्ट्रवादी शिवसेनेला खाऊन टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तर त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif ) यांनी चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) हे वस्तुस्थिती पाहून बोलत नाहीत, असे म्हणत शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना आम्ही पक्षात घेतले नसल्याचे मुश्रीफ म्हणाले. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांची ये-जा चालू असते. ताटात काय आणि वाटीत काय सर्व एकच आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी इतका हळवा होण्याची गरज नाही, असा टोला हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
द्राक्ष उत्पादकांसाठी वाईबाबत निर्णय - तसेच राज्य शासनाने वाईनबाबत ( Wine At Supermarket ) घेतलेल्या निर्णयाचे हसन मुश्रीफ यांनी स्वागत केले आहे. वाईन उत्पादनामुळे द्राक्ष उत्पादकांना चांगले पैसे मिळतील या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्याच्या महसुलातही वाढ होईल. यामुळे यास विरोध करायचे काही कारण नाही. दारूबंदी प्रबोधन करूनच झाली पाहिजे यासाठी लोकांनी मनावर घेतले पाहिजे. दारुबंदीसाठी सर्व पक्षांनी प्रबोधन करण्याची गरज असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. ते आज (दि. 29 जानेवारी) कोल्हापुरात ( Kolhapur ) पत्रकारांशी बोलत होते.
मध्यप्रदेशमध्ये घराघरात वाईन वाटली जाते यावर भाजप नेते का नाही बोलत -राज्य सरकारने किराणा दुकान व सुपर बाजार ( Wine At Supermarket ) येथे वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपने याला तीव्र विरोध करत टीकेची झोड उठवलेली आहे. यावर मुश्रीफ म्हणाले, मध्यप्रदेशात घरोघरी वाईन वाटली जाते. यावर भाजप नेते काही का बोलत नाही, असा सवालही ( Minister Hasan Mushrif On BJP ) त्यांनी उपस्थित केला आहे.