महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी सोमैयांवर ठोकला 100 कोटींचा दावा - scam allegations on Hassan Mushrif

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट सोमैया यांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोमैया यांच्याकडून सातत्याने मुश्रीफ यांच्या विरोधात घोटाळ्याचे आरोप सुरू आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात कोल्हापूरच्या न्यायालयात 100 कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे.

Mushrif filed a claim against Somaiya
किरीट सोमैया विरोधात 100 कोटीचा दावा

By

Published : Sep 28, 2021, 9:08 PM IST

कोल्हापूर - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट सोमैया यांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोमैया यांच्याकडून सातत्याने मुश्रीफ यांच्या विरोधात घोटाळ्याचे आरोप सुरू आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात कोल्हापूरच्या न्यायालयात 100 कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे. स्वतः मुश्रीफ यांच्या वकिलांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, संबंधित नोटीससुद्धा आपल्याकडून सोमैया यांनी स्वीकारली नसल्याचे वकिलांनी म्हटले आहे.

माहिती देताना मंत्री मुश्रीफ यांचे वकील

हेही वाचा -बंदी असतानाही बैलगाडी शर्यत; राधानगरी पोलिसात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

सोमैया यांचे आरोप

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमैया यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरसुद्धा सोमैया यांनी 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. याबाबत मुश्रीफ यांनी आपल्यावरील आरोप केवळ राजकीय सूडबुद्धीने सुरू असून माझ्याकडून कोणत्याही पद्धतीने घोटाळा झाला नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे, किरीट सोमैया यांनी हे आरोप सिद्ध करावेत. असे नाही केल्यास त्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात 100 कोटींचा दावा दाखल करणार असल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज मुश्रीफ यांनी किरीट सोमैया यांच्या विरोधात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. मुश्रीफ यांचे वकील प्रशांत चिटणीस यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.

चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा नोटीस स्वीकारली नाही

दरम्यान, हसन मुश्रीफ यांचे वकील प्रशांत चिटणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना सुद्धा याबाबतची एक नोटीस देण्यासाठी गेले असता त्यांनी सुद्धा आपण झोपलो आहे, त्यामुळे नोटीस घेऊन नंतर या, अशा पद्धतीचे उत्तर दिल्याची माहिती वकिलांनी दिली. दरम्यान, आज भाजप नेते सोमैया मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुरगुड येथील पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली आहे. येत्या सात दिवसांत गुन्हा नोंद केला नाही तर, पुढील कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्यांच्याविरोधात कोर्टात जाऊ, असेही सोमैया यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -चिथावणीखोर भाषण न करता संयमाने दौरा करावा, सोमैया यांना ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांचा सल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details