महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Load shading in Maharashtra : जयंत पाटलांच्या कोल्हापूरच्या कार्यक्रमात चार ते पाच वेळा वीजपुरवठा खंडित; उर्जामंत्र्यांचा दावा फोल

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यात भारनियमन नसल्याचा दावा करतानाच कोल्हापूरमधील राष्ट्रवादींच्या सभेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant patil) उपस्थित असताना चार पाच वेळा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे प्रत्यक्षात अघोषित भारनियमन सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Jayant Patil
Jayant Patil

By

Published : Apr 21, 2022, 7:18 PM IST

Updated : Apr 21, 2022, 7:44 PM IST

कोल्हापूर : एकीकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यात भारनियमन नसल्याचे म्हटले आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जलसंपदामंत्री यांच्या कोल्हापूरातील कार्यक्रमावेळीच जवळपास चार ते पाच वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे पाहायला मिळाले. यावर त्यांची प्रतिक्रिया सुद्धा घेतली असता उन्हाळ्यात मागणीपेक्षा पुरवठा कमी पडत असल्याने भारनियमन करण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऊर्जामंत्री भारनियमन नसल्याचे (Load shading in Maharashtra) सांगत असले तरी प्रत्यक्षात अघोषित भारनियमन सुरू असल्याचे बोलले जात आहे.

जयंत पाटील प्रतिक्रिया

'देशभरातच ऊर्जा कमी; ऊर्जेची बिकट अवस्था'
यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना ऊर्जा मंत्री भारनियमन नाही सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात सर्वत्र अनेकवेळा लाईट जात असल्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, 'देशभरात ऊर्जेचा टंचाई भासत आहे त्यामुळे बिकट अवस्था निर्माण झाली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील उदाहरण घ्यायचे झाले तर उन्हाळ्यात मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळेच ऊर्जा खात्याला भारनियमन करणे अतिशय गरजेचे बनले आहे.' असेही ते म्हणाले. शिवाय मागील दोन अडीच वर्षांत कोरोनामध्ये सुद्धा नवीन ऊर्जा निर्मितीबाबत काही करता आले नाही. त्यामुळे नागरिकांना भारनियमन जाणवत आहे, याची आमच्या सरकारला जाणीव आहे. त्यामुळे उर्जामंत्री यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद यात्रा राज्यभर सुरू आहे. याची कोल्हापूरात सांगता होत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना जवळपास 5 ते 6 वेळा लाईट वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे भारनियमनचा मुद्दा यानिमित्ताने समोर आला. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हंटले होते ऊर्जामंत्री नितीन राऊत?
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विजेचा तुटवडा जाणवत होता. मात्र, आजची परिस्थिती पाहता राज्यात कुठेही भारनियमन नाही असा दावा राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी 'ईटीव्ही भारत'च्या विशेष मुलाखतीत बोलताना केला होता. मात्र, तो आता कितपत खरा आहे असा सवाल यानिमित्ताने समोर आला आहे.
हेही वाचा -Gunratna Sadavarte Police Custody : गुणरत्न सदावर्तेंना 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निर्णय

Last Updated : Apr 21, 2022, 7:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details