महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पूर परिस्थिती नियंत्रणात.. शिरोळला आठ टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा - चंद्रकांत पाटील

शिरोळमधील गावांमधे केवळ 5 टक्के लोकं राहिले आहेत. त्याठिकाणी 65 बोटी कार्यरत असून त्यांनाही उद्या हलवण्यात येणार आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर, कनवाड, नृसिंहवाडी या गावांत आठ टन अन्न व जीवनावश्यक वस्तू हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुरवण्यात आल्या आहेत.

पूर परिस्थिती नियंत्रणात, हेलिकॉप्टरमधून शिरोळला आठ टन अन्न जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा - चंद्रकांत पाटील

By

Published : Aug 11, 2019, 11:06 PM IST

Updated : Aug 11, 2019, 11:13 PM IST

कोल्हापूर -शिरोळमधील खिद्रापूर, राजापूर, कनवाड, नृसिंहवाडी या गावांत हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आठ टन अन्न व जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात आल्या आहेत. 1 लाख 20 हजार डिझेल, पेट्रोल आणि एलपीजी गॅस सिलेंडर आज शहरात आणण्यात आले आहेत. पाणी पातळीत मोठया प्रमाणात घट होत असल्याने पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. विस्कळीत झालेले जनजीवन आठवडाभरात सुरळीत होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यानी व्यक्त केली.

पूर परिस्थिती नियंत्रणात, हेलिकॉप्टरमधून शिरोळला आठ टन अन्न जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा - चंद्रकांत पाटील

पालकमंत्री पाटील यांनी आज सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी मंत्री महादेव जानकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 1 लाख 48 हजार वीज कनेक्शन सुरु झाले असून अजूनही 1 लाख वीज कनेक्शन जोडण्यासाठी 150 जणांचे पथक आले आहे. येत्या दोन दिवसात ते सुद्धा सुरु होतील. 90 पशुवैद्यकीय डॉक्टरांचे पथक शहरात दाखल होत आहे. पुरामुळे आलेल्या कचऱ्यासाठी एक केमिकल आणून त्याच्यावर मारण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची दुर्गंधी येणार नाही परिणामी तो कचरा लवकर कुजेल.

पाटील पुढे म्हणाले, शिरोळमधील गावांमध्ये केवळ 5 टक्के लोक राहिले आहेत. त्याठिकाणी 65 बोटी कार्यरत असून त्यांनाही उद्या हलवण्यात येणार आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर, कनवाड, नृसिंहवाडी या गावात आठ टन अन्न व जीवनावश्यक वस्तू हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुरवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 249 गावांमधून 51 हजार 262 कुटुंबातील 2 लाख 47 हजार 678 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 208 संक्रमण शिबिर आले आहेत. यामध्ये 78 हजार 621 पूरग्रस्तांचा समावेश आहे. महापुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आठवडाभरात सुरळीत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.

Last Updated : Aug 11, 2019, 11:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details