महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chandrakant Patil Slammed Sharad Pawar : पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शरद पवार यांची तयारी सुरू आहे का- चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil press in Kolhapur

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी ( PM Modi Security issue ) म्हणजे घातपात करण्याचा डाव होता, असाही दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP president Sharad Pawar ) यांनी स्वतःच्या जीवावर महाराष्ट्रात सरकार आणलेले नाही, असेही चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil slammed Sharad Pawar ) म्हणाले.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

By

Published : Jan 12, 2022, 6:39 PM IST

Updated : Jan 13, 2022, 9:19 AM IST

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची तयारी सुरू आहे का? तेच सर्व आंदोलक संघटनांशी चर्चा करत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी ( Chandrakant Patil slammed Sharad Pawar ) केली. ते शहरात ( Chandrakant Patil press in Kolhapur ) माध्यमांशी बोलत होते. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी म्हणजे घातपात करण्याचा डाव होता, असाही दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केला आहे.

ती घटना म्हणजे नरेंद्र मोदी यांचा घातपात करण्याचा डाव

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील म्हणाले, की गेल्या काही दिवसापूर्वी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत जे घडले ( ( PM Modi Security issue ) ते सगळ्यांनी पाहिले आहे. ती घटना म्हणजे नरेंद्र मोदी यांचा घातपात करण्याचा डाव होता. हे एका वाहिनीच्या स्टिंगवरून समोर आले. त्यामुळे किमान आता तरी काँग्रेसने हे मान्य करावे. पंजाब राज्य सरकारने योग्य ती सुरक्षा न पुरवल्याने ही घटना घडली आहे. देशाचे पंतप्रधान एखाद्या मार्गावरून जात असतात त्यावेळी प्रोटोकॉलनुसार तेथील सर्व दुकाने बंद करायचे असतात. मात्र त्या पुलाखालची सर्व दुकाने उघडी होती. पण काँग्रेस आणि इतर पक्षांनी या घटनेची खिल्ली उडवली. पंजाबचे मुख्यमंत्र्यांनी तरी सांगितले होते की प्रियांका गांधी यांना सर्व रिपोर्ट करत होते. प्रियंका गांधींना प्रत्येक रिपोर्ट देण्याचा काय संबंध? त्यांना काँग्रेसमध्ये कोणते स्थान किंवा पद आहे? म्हणजे हे सर्व नियोजित होते का? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी ( Chandrakant Patil Slammed Congres over PM security ) उपस्थित केला आहे.

त्या ठिकाणापासून पाकिस्तान सीमा केवळ 13 किलोमीटरवर

चंद्रकांत पाटील म्हणाले, की पंजाबमध्ये घडलेल्या प्रकाराच्या वेळेसची अधिकाऱ्यांचे संभाषण समोर आले आहे. या संभाषणावरून स्पष्ट होते की त्या रूटवर काहीतरी गडबड होणार आहे. जर काही घडले तर कोणतीही कारवाई करू नये, हे देखील संभाषणातून समोर आले आहे. पंतप्रधान मोदींच्या ताफ्याजवळ शेतकऱ्यांबरोबर काही खलिस्तानीदेखील होते, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या ठिकाणापासून पाकिस्तान सीमा केवळ 13 किलोमीटरवर होती. हा प्रकार अत्यंत गंभीर घेण्याचा आहे. आम्ही याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी कॅन्डल मार्च काढत प्रोबधनदेखील केले. आम्ही रस्त्यावर उतरणार असून संबधित व्यक्तींवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीदेखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

बहुतेक शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदासाठी तयारी सुरू

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ही टीका केली . ते म्हणाले, शरद पवार हे सरकार मधे नाहीत मात्र ते एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बैठकीसाठी कसे बसू शकतात.तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेबद्दल बोलताना ते म्हणाले, शिवसेनेत नेतृत्वाचा इतका अभाव निर्माण झाला आहे की शिवसेनेच्या मंत्र्यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचा संप वर तोडगा काढण्यासाठी बैठका घ्याव्या लागत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत शरद पवार यांचेच मुख्यमंत्रीपदासाठी तयारी सुरू आहे का असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा-Mayor Kishori Pednekar : लस न घेणाऱ्यांचे ८४ टक्के मृत्यू! लस घेऊन सुरक्षित व्हा -किशोरी पेडणेकर

फसवून करणे ही काँग्रेसची परंपरा
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या सहयोगी उमेदवारांना पराभूत करणे ही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची पूर्वजांपासून परंपराच आहे आणि तीच परंपरा आत्ताचे नेते देखील जपत आले आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे, अशोक चराटी आदींचा पराभव झाला आहे याबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाची ताकद मर्यादित होती. अधिक जागा देणाऱ्या सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांनी आवाडे, चराटी यांना राजकारण करून पराभूत केले. फसवून पराभूत करणे हीराष्ट्रवादी कॉंग्रेस व काँग्रेसची पहिल्यापासूनच परंपरा आहे. तरीही जिल्हा बँकेमध्ये आमचा फायदा झाला भाजपचे तीन सदस्य निवडून आले आहेत.

हेही वाचा-CORONA UPDATE : भारतात कोरोनाचे 1लाख 94 हजार 720 नवीन रुग्ण, मृत्यूची संख्या चिंताजनक

हसन मुश्रीफ हे कागलचे नेते त्यांना बाहेरचे काही कळत नाही
राज्यातील करोना निर्बंधावरून राज्य सरकारने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावत त्यांना मोदींचे नियम मान्य नसतील तर आम्ही तसे मोदींना कळवू असे मत व्यक्त केले होते. यावर प्रत्युत्तर देत हसन मुश्रीफ यांना कागलच्या बाहेरचे काही समजत नाही असे म्हणत टोला लगावला आहे. राज्यात करोना नियंत्रणाबाबत एकसूत्री कारभाराचा अभाव आहे. शाळा सुरू ठेवायच्या, बंद करायच्या की ऑनलाइन सुरु ठेवायच्या याबाबतही राज्यातील मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. यावर भाजपचा आक्षेप आहे. अशी टिकाही त्यांनी केली.

Last Updated : Jan 13, 2022, 9:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details