महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

७ जूनला महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक, अपक्ष आमदारही होणार सहभागी - सतेज पाटील - राज्यसभा निवडणूक सतेज पाटील प्रतिक्रिया

सहावी जागा जिंकण्यासाठी शिवसेना भाजप या दोन्ही ( Meeting of MLA of Maha Vikas Aghadi says Satej Patil ) पक्षांकडे मतांची संख्या नसल्याने त्यांना अपक्ष आमदारांची ( Satej patil on Independent MLA ) साथ लागणार आहे, यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांची मनधरणी करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली. या पार्श्वभूमीवर 7 जूनला सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात आली असून या मध्ये अपक्ष आमदार ही सहभागी होणार असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे.

Meeting of MLA of Maha Vikas Aghadi says Satej Patil
सतेज पाटील

By

Published : Jun 5, 2022, 4:45 PM IST

कोल्हापूर -राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका ( Satej patil on Rajya Sabha ) होत असून, एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर भाजपकडून धनंजय महाडिक हे उमेदवार आहेत. सहा जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सहावी जागा जिंकण्यासाठी शिवसेना भाजप या दोन्ही ( Meeting of MLA of Maha Vikas Aghadi says Satej Patil ) पक्षांकडे मतांची संख्या नसल्याने त्यांना अपक्ष आमदारांची ( Satej patil on Independent MLA ) साथ लागणार आहे, यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांची मनधरणी करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली. या पार्श्वभूमीवर 7 जूनला सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात आली असून या मध्ये अपक्ष आमदार ही सहभागी होणार असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे.

माहिती देताना काँग्रेस नेते सतेज पाटील

हेही वाचा -Kasturi Savekar Kolhapur : माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या कस्तुरीचे कोल्हापुरात जंगी स्वागत

भाजप, शिवसेना या दोन्ही पक्षांनी आमचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने महविकास आघाडीकडून सर्व आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. येत्या 7 जूनला सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. भाजपची विचारसरणी काही जणांना पटत नसल्याने त्यांनी आमच्यासोबत येऊन सत्ता स्थापन केली आणि गेली अडीच वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांची अनेक कामे करून दिली आहेत. त्यामुळे ते महाविकास आघाडी सोडून जाणार नाहीत, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेसने दिलेल्या उमेदवारासंदर्भात कोणाच्याही मनात नाराजी नसल्याचेही पाटील

भाजपकडून सुडाचे राजकारण -भाजपकडून देशासह संपूर्ण राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे आणि ते हाणून पाडने गरजेचे असून भाजपकडून जीएसटीचा प्रश्न असो किंवा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महत्व कमी करण्याचे षडयंत्र केले जात असून, याला कोणताही आमदार प्रतिसाद देणार नाही. भाजपने आम्हाला सल्ला देण्यापेक्षा स्वतःचे आमदार सांभाळावे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक आमदारांची काम केली असून हे आमदार भाजप विचारसरणीबरोबर न जाता महाविकास आघाडी सोबतच राहतील व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार यांनाच विजयी करतील, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराचे मूळ देखणे रूप येणार समोर; संगमरवरी फरशी काढण्याचे काम सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details