कोल्हापूर - शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघातात निधन झाले त्यांच्या जाण्याने मराठा समाजाची मोठी हानी झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील Dilip Patil of Maratha Kranti Morcha यांनी म्हटले आहे शिवाय त्यांच्या या अपघातामागे त्यांनी संशय व्यक्त केला आहे अपघात पहाटे झाला आज सकाळी 12 वाजता मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत तातडीची बैठक बोलावण्यात आली होती ही बैठक ज्यांनी बोलावली होती त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे शिवाय त्यांच्यावर या बैठकीला येण्याबाबत दबाव टाकण्यात आला होता जर आज बैठक तातडीने बोलावली नसते तर नक्कीच हा अपघात टळला असता असेही ते म्हणाले त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी व्हावी असेही पाटील यांनी म्हटले
Vinayak Mete Accident मेटेंच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी - विनायक मेटेंच्या अपघाताची प्रशासनाने चौकशी करावी
विनायक मेटे यांचा अपघात पहाटे झाला आज सकाळी 12 वाजता मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत तातडीची बैठक बोलावण्यात आली होती ही बैठक ज्यांनी बोलावली होती त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे शिवाय त्यांच्यावर या बैठकीला येण्याबाबत दबाव टाकण्यात आला होता जर आज बैठक तातडीने बोलावली नसते तर नक्कीच हा अपघात टळला असता असेही मराठा क्रांती मोर्चाचे Dilip Patil of Maratha Kranti Morcha दिलीप पाटील म्हणाले
'सखोल चौकशी व्हावी' : प्रशासनाने चौकशी केली पाहिजे. कोणी तरी दबाव निर्माण केला त्यामुळेच बैठकीची वेळ बदलली. कोणी वेळ बदलली हे आम्हाला माहीत आहे. पण आम्ही नाव घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करावी. हा अपघात आहे. त्यामागे काही घातपात असेल तर चौकशी व्हावी. मेटे हे मराठा समाजाचे नेते होते. ही वेळ बदलली नसती तर मेटे सकाळी निघाले असते. कोणताही अपघात झाला नसता. कदाचित ड्रायव्हरला झोप लागली असेल तर त्यालाही बदलण्यात आलेली बैठकीची वेळच जबाबदार आहे, असेही मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -Vinayak Mete Funeral विनायक मेटेंवर सोमवारी बीड येथे होणार अंत्यसंस्कार