कोल्हापूर - मराठा आरक्षणासंदर्भात आज(बुधवारी) कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मात्र, आज सकाळापासूनच आंदोलनस्थळी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तरीही भर पावसातसुद्धा मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळी दाखल झाले आहेत. या संदर्भातच मराठा समाजातील समन्वयकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाचे रणशिंग फुकण्यात आले आहे. यामध्ये सर्वच नेत्यांनी आंदोलनस्थळी येऊन आपली भूमिका मांडायची आहे. बुधवारी शाहू समाधीस्थळापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असून नाशिक, औरंगाबाद, अमरावती, आणि कोकण मध्ये पाहिल्या टप्प्यात आंदोलने होणार आहेत. दरम्यान, आजच्या मूक आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.