कोल्हापूर - तिरूमला देवस्थानकडून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक वर्षी मानाचा शालू पाठवण्याची एक प्रथा आहे. तिरुपतीहून आलेला हा मानाचा शालू आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपुर्द करण्यात आला. पारंपारिक रीतीरिवाजाप्रमाणे देवस्थान समितीच्या कार्यालयांमध्ये या शालूचे पूजन करून तो अंबाबाईला अर्पण केला.
यंदाही रितीरिवाजाप्रमाणे अंबाबाईला शालू -
तिरूमला देवस्थानकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे हा शालू सुपूर्त करण्यात आला. आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान तिरूमल्ला देवस्थानचे डेप्युटी ऑफिसर एम. रमेश बाबू, के. रामा राव यांच्यासह तिरुमल्ला देवस्थानचे अन्य पदाधिकारी, सदस्य अंबाबाईला शालू घेऊन कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी रीतीरिवाजाप्रमाणे देशभरातील अनेक देवस्थानला तिरुपतीहून शालू साडी पाठवण्याची प्रथा आहे. तीच प्रथा आम्ही कायम ठेवल्याचे एम. रमेश बाबू यांनी म्हटले.