महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

KDCC Bank Election : महविकास आघाडीमध्ये फूट.. शिवसेनेकडून सर्व जागांवर पॅनल, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजपला आवतान - केडीसीसी निवडणूक

कोल्हापूर जिल्हा बँक (KDCC Bank Election) निवडणुकीत महविकास आघाडीत फूट पडली आहे. महविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात जागा वाटपावरून वाद झाला आहे. शिवसेनेला तीन जागा हव्या तर काँग्रेस व राष्ट्रवादी 2 जागा सोडण्यास तयार होते. केवळ एका जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला जवळ केले. यामुळे संतप्त शिवसेनेने आरपीआय व शेकापला जवळ करत पॅनल उभे करत सर्व जागांवर उमेदवार (KDCC Bank Election) जाहीर केले आहेत.

Kolhapur District Bank elections
Kolhapur District Bank elections

By

Published : Dec 21, 2021, 8:06 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक (Kolhapur District Bank Election)आता चांगलीच रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जागा वाटपावरून एकमेकांची मनधरणी करता-करता सत्ताधाऱ्यांच्या नाकी नऊ आले होते. अशातच सोमवारी रात्री उशिरा पर्यंत महविकास आघाडीच्या (KDCC Bank Election) तिन्ही पक्षात जागा वाटपासाठी खलबते चालू होती. शिवसेनेला 3 जागा हव्या होत्या. परंतु काँग्रेस राष्ट्रवादी 2 जागा सोडण्यास तयार होते. केवळ एका जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपशी जवळीक केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने आरपीआय आणि शेकापला जवळ करत सर्व जागांवर पॅनल जाहीर केलंय.

यामुळे आता जिल्हा बँक निवडणुकीत महविकास आघाडीत फूट पडली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेला एकटे पाडल्याने मुख्यमंत्र्यांचा निदर्शनास हा प्रकार आणून देणार असल्याचे देखील संपर्क नेते अरुण दुधवडकर यानी सांगितले. तसेच सेनेच्या कोट्यातून मंत्री असतानाही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलेल्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याबाबत ही सविस्तर अहवाल देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

केडीसीसी बँक निवडणुकीत महविकास आघाडीमध्ये फूट..
सत्तारुढ पक्षाच्या वतीने 9 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर -
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Kolhapur District Bank Election) निवडणुकीत सत्तारूढ पक्षाच्या वतीने नऊपैकी सहा जागांवरील उमेदवारांची नावे सोमवारी रात्रीच जाहीर केली होती. तर उरलेल्या तीन जागांसाठी शिवसेनेची वाट पाहू अन्यथा उद्या सकाळी 11 वाजता उमेदवार जाहीर करू, असे सांगण्यात आले होते. मात्र आता सत्तारूढ पॅनलकडून सर्वच 9 जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत.


हे ही वाचा -Sugar Industry Maharashtra : देशातील पहिली सहकार परिषद व अमित शाह यांच्या दौऱ्यातून सहकार व साखर उद्योगाच्या अपेक्षा

नऊ उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे -

-प्रकाश आवाडे
-मदन कारंडे
-प्रताप उर्फ भैय्या माने
-राजू बाबा आवळे
-ऋतिका शाहू काटकर
-विजयसिंह माने
-खासदार निवेदिता माने
-स्मिता गवळी
-प्रदीप पाटील भूयेकर

शिवसेनेचे देखील स्वतंत्र पॅनल जाहीर-

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना आपल्यासाठी तीन जागा मिळाव्यात या मतावर ठाम होती. परंतु सत्तारूढ गटाच्या वतीने दोन जागा देण्यात येत होत्या. यामुळे शिवसेना, आरपीआय एकत्र येत स्वतंत्र पॅनेल तयार करुन लढणार असल्याचे शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सोमवारी रात्रीच सांगितले होते. त्याप्रमाणे आज शिवसेनेकडून पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. या पॅनलमधील पुढील उमेदवार आहेत.

-संजय मंडलिक
-बाबासाहेब पाटील
-प्रा.अर्जुन अबीटकर
-क्रांतिसिंह पवार पाटील
-लतिका शिंदे
-रेखा कुऱ्हाडे
-उत्तम कांबळे
-विश्वास जाधव
-रवींद्र मडके
-विजय यशवंत पाटील
-यशवंत नांदेकर

एकूण ५ जणांची जिल्हा बँकेत बिनविरोध निवड -

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक रंगतदार बनली आहे. जिल्ह्यातील २ बडे नेते बिनविरोध निवडून आले आहेत. १५ दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हे बिनविरोध निवडून आले होते. तर काल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे कागल मधून बिनविरोध जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवडून गेले आहेत. आज चंदगड विकास संस्थामधून आमदार राजेश पाटील, करवीर विकास संस्थामधून पी. एन. पाटील तर राधानगरी गटातून ए. वाय. पाटील यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details