कोल्हापूर - कोथरूडमध्ये विजयासाठी काहीच अडचण नाहीये. जवळपास 1 लाख 60 हजारांहून अधिक मताधिक्याने माझा विजय होईल, याशिवाय कोल्हापूरमध्ये सुद्धा सर्व 10 जागांवर युतीचे उमेदवार निवडून येतील, असा ठाम विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
कोथरूडमध्ये वनवे तर कोल्हापुरात युतीच्या 10 जागा येणार - चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे केले मतदान
ही निवडणूक जनतेने हाती घेतली असून कोथरूडमध्ये एकतर्फी लढत असून कोल्हापुरातील सर्व १० जागा महायुती जिंकेल, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा... मतदानाच्या दिवशी चंद्रकांत पाटलांची विरोधी उमेदवाराला 'ऑफर'
जनतेने ही निवडणूक हाती घेतली असून युतीचे 250 हुन अधिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून कोथरूडमध्ये प्रत्येक बूथला भेट देऊन मतदानासाठी चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आले आहेत. कोल्हापुरातल्या कळंबा येथील शिलादेवी डी. शिंदे हायस्कुलमधील मतदानकेंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.