महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : आमदारांनंतर खासदार सुद्धा शिंदेंच्या गळाला! मग माजी आमदारांचे काय? - कोल्हापूर माजी आमदार

जवळपास 40 हून अधिक आमदार एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे वळवले असून एक मोठे बंड केले आहे. केवळ आमदारच नाही तर आता काही खासदार सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. असे असताना माजी आमदारांना एकनाथ शिंदे यांनी संपर्कच केला नसल्याचे ( Shiv sena Ex MLA and MP ) समजते. कोल्हापुरातील 5 माजी आमदार यांनी स्वतः 'ईटीव्ही भारत'शी बोलताना याबाबत माहिती दिली. शिवाय आपण शिवसैनिक आहोत आणि राहणार असेही त्यांनी म्हटले आहे. पाहुयात प्रतिनिधीने घेतलेला आढावा...

Maharashtra Political Crisis
कोल्हापुरातील माजी आमदार

By

Published : Jun 23, 2022, 4:06 PM IST

कोल्हापूर - एकीकडे एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण शिवसेना फोडून आपल्याकडे खेचली आहे. जवळपास 40 हून अधिक आमदार त्यांनी आपल्याकडे वळवले असून एक मोठे बंड केले आहे. केवळ आमदारच नाही तर आता काही खासदार सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. असे असताना माजी आमदारांना एकनाथ शिंदे यांनी संपर्कच केला नसल्याचे समजते. कोल्हापुरातील 5 माजी आमदार यांनी स्वतः 'ईटीव्ही भारत'शी बोलताना याबाबत माहिती दिली. शिवाय आपण शिवसैनिक आहोत आणि राहणार असेही त्यांनी म्हटले आहे. पाहुयात प्रतिनिधीने घेतलेला आढावा...

कोल्हापूरचे 5 माजी आमदार गोवा टूरवर -एकनाथ शिंदे यांनी बंड करून अनेक आमदारांना आपल्यासोबत गुजरातला नेल्याची बातमी समोर येताच राज्यभरातील विद्यमान आमदार कुठे आहेत पाहिले असता अनेकजण एकनाथ शिंदे यांच्यासोबतच गेल्याची माहिती समोर आली. यामध्ये कोल्हापूरचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर आणि अपक्ष आमदार आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचे समोर आले. दुसरीकडे त्याचवेळी माजी आमदार मात्र नेमके कुठे आहेत याबाबत माहिती घेतली असता कोल्हापुरातील शिवसेनेचे 5 माजी आमदार एकाचवेळी गोवा टूरला गेल्याची माहिती मिळाली होती. नुकतेच ते सर्वजण गोवा टूरवरून परतले आहेत. याबाबत माजी आमदार राजेश क्षीरसागर तसेच माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी माहिती दिली. एकीकडे राज्यात सुरू असलेली राजकीय उलथापालथ पाहता त्यांनी सुद्धा आपले गोव्याला आल्याची वेळच चुकली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवाय आम्ही माजी आमदार नेहमीच आगामी निवडणुका आणि शिवसेनेच्या रणनितीबाबत चर्चा करत असतो. मग ते ठिकाण कोल्हापूर, मुंबई किंवा गोवा असे काहीही असते असेही ते म्हणाले. हे सांगत असताना माजी आमदारांनी काही काही मुद्द्यांवर बोलणे टाळले, तरी आपण शिवसैनिक आहोत उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत आणि मातोश्री आमचे मंदिर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय आम्हाला एकनाथ शिंदे यांनी संपर्क केला नसल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.

जर आम्ही म्हणजेच शिवसेना म्हणायचे आहे तर माजी आमदार तसेच खासदारांना का संपर्क नसावा?दरम्यान, एकीकडे एकनाथ शिंदे यांनी विद्यमान शिवसेनेचे तसेच काही अपक्ष आमदार आपल्यासोबत करून सरकार धोक्यात आणले आहे. राष्ट्रवादी तसेच काँग्रेस सोबत युती तोडावी असेही त्यांनी म्हंटले आहे. मात्र दुसरीकडे आता आपल्यासोबत 40 हून अधिक आमदारसोबत असून आम्ही म्हणजेच शिवसेना आहेत, असा दावा ते करत आहेत. असे असताना एकही विद्यमान खासदार किंव्हा माजी आमदार आणि खासदार त्यांच्यासोबत आता दिसत नाहीयेत. त्यामुळे सोबत असलेले आमदार म्हणजेच शिवसेना असे बोलत असताना त्यांनी माजी आमदार-खासदार तसेच विद्यमान खासदारांना संपर्क का केला नसावा, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे त्यांचा नेमका काय प्लॅन आहे हा सुद्धा सस्पेन्स कायम आहे.

शिंदे यांचे निकटवर्तीय माजी आमदार आता चक्रव्यूहमध्ये अडकले -एकनाथ शिंदे हे शिवसेनेमधील मोठे नेते आहेत. त्यामुळे राज्यभरातील अनेक आमदार तसेच अनेक शिवसेनेचे नेते त्यांच्या नेहमीच संपर्कात असतात. सद्या सुरू असलेल्या राजकीय हालचालींवरून आणि त्यांना आमदारांनी पाठिंबा दिल्याचे जे दिसत आहे यावरुन त्यांची सेनेमधील ताकद स्पष्टपणे समोर आली आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असलेले अनेक माजी आमदार तसेच खासदार आहेत. काही माजी आमदार आता सुरू असलेली राजकीय वातावरण पाहून हे सगळे थांबवून जे काही आहे ते चर्चेतून मिटले पाहिजे, शिवाय पुन्हा एकदा ताकदीने शिवसेना उभी राहिली पाहिजे, असे बोलत आहेत. काहीजण तर आम्हाला शिवसेना हेच माहिती असून इतर काहीही माहिती नसल्याचे म्हणत आहेत. तर काहीजण आपण आता कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही असे सांगत आहेत. अनेकजण तर आपण आता चक्रव्यूहमध्ये अडकल्याचे सांगताहेत.

कोल्हापूर जिल्हा आणि शिवसेना -कोल्हापुरात जे माजी आमदार आहेत त्यामध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे राजेश क्षीरसागर, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे सत्यजित पाटील सरूडकर, करवीर विधानसभा मतदारसंघाचे चंद्रदीप नरके, हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे सुजित मीनचेकर आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे उल्हास पाटील या 5 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 10 पैकी तब्बल 6 आमदार निवडून आले होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत केवळ राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे प्रकाश आबिटकर यांचा विजय झाला. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकच आमदार आहे तर कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीनंतत सत्तास्थापना करत असताना शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्वतः शिवसेनेला पाठिंबा दिला आणि शिवबंधन बांधत त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळाले.

हेही वाचा -Shivsena MLA In Guwahati : गुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये आमदारांची घोषणाबाजी, पाहा VIDEO

हेही वाचा -Nitin Deshmukh Photo VIRAL : नितीन देशमुखांना आम्ही विमानाने घरी पाठवलं, शिंदे गटाचा दावा; तर देशमुखांचे विमानातले फोटो VIRAL

हेही वाचा -Sanjay Raut Appeal to Eknath Shinde : शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, तुम्ही 24 तासांत मुंबईत दाखल व्हा - राऊतांचे शिंदेंना आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details