महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

टोपेंच्या उपस्थितीने अधिकाऱ्यांची तारांबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या आधीच आरोग्यमंत्री टोपे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेणार होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. मात्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त कादंबरी बलकवडे हे उपस्थित नव्हते. जिल्हाधिकारी कार्यालयात ते उशिरा आल्याने यांची तारांबळ उडाली.

आरोग्यमंत्री टोपे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात
आरोग्यमंत्री टोपे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात

By

Published : Jul 16, 2021, 11:15 AM IST

Updated : Jul 16, 2021, 1:41 PM IST

कोल्हापूर- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची शुक्रवारी सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात बैठक होती. या बैठकीत ते लवकर आले होते. मात्र जिल्ह्याधिकारी कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नव्हता. आरोग्यमंत्री वेळेपूर्वीच कार्यालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच जिल्ह्याधिकाऱ्यासह सर्वच अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे दृश्य यावेळी पाहायला मिळाले. दरम्यान कोल्हापुरातील व्यापार सुरू करावा, लसीकरण पूर्ण करावे. अन्यथा राज्य सरकारला त्याचा जाब विचारू असा इशारा भारतीय जनता पार्टीने दिला. त्याबाबतचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देण्यात आले.

जिल्ह्याधिकाऱ्यांची आधी आरोग्यमंत्री बैठकीसाठी कार्यालयात हजर-

आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेणार होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. मात्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त कादंबरी बलकवडे हे उपस्थित नव्हते. जिल्हाधिकारी कार्यालयात ते उशिरा आल्याने यांची तारांबळ उडाली.

आज दिवसभर घेणार कोरोना संदर्भातील आढावा-

आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी रात्री उशिरा ते शासकीय विश्रामगृह येथे दाखल झाले. आज सकाळपासून त्यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांची चर्चा केली. नऊ वाजता जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण, महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे, आरोग्य शल्य चिकिस्तक अनिल माळी, डॉक्टर योगेश साळी यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर राजर्षी शाहू ब्लड बँक याच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हीसीवर संवाद साधला जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हीसी द्वारे संपर्क साधणार आहेत. त्यानंतर एक वाजता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद होणार आहे.

Last Updated : Jul 16, 2021, 1:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details