कोल्हापूर -साखर उत्पादनात अनेक वेळा उत्तर प्रदेश देशात अव्वल स्थानी होते. यावर्षी सर्व रेकॉर्ड तोडून महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात पहिला ( Maharashtra first in sugarcane production ) क्रमांक आहे. विशेष म्हणजे साखर उत्पादनात महाराष्ट्राने ऑस्ट्रेलिया, चीन, थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या सर्व देशांपेक्षा उत्पादनात ( MH sugar production in India ) आघाडी घेतली आहे.
राज्यातील साखरेचे उत्पादन अव्वल झाले ( sugar production in the India ) असताना एकट्या कोल्हापूर विभागाने राज्यात बाजी ( Kolhapur division sugar production ) मारली आहे. राज्यातील एकूण उत्पादनाच्या 23 टक्के इतके विक्रमी उत्पादन घेतले ( Sugar record production in India ) आहे. राज्यात सध्या 11 कोटी मेट्रिक टनांहून अधिक ऊस गाळप झाले आहे. त्यापैकी एकट्या कोल्हापूर विभागाने अडीच कोटी मेट्रिक टन इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. यावर ईटीव्ही भारतने विशेष रिपोर्ट केला आहे.
गतवर्षीच्या तूलनेत कोल्हापूर विभागाचे अधिकचे उत्पादन-कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालक ए. व्ही. गाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी कोल्हापूर विभाग 2 कोटी मेट्रिक टनाहून अधिकचे उत्पादन घेत असतो. गतवर्षी 2020-21 मध्ये कोल्हापूर विभागात 2 कोटी 31 लाख 8 हजार 558 मेट्रिक टन इतके उसाचे गाळप झाले होते. तर 2 कोटी 77 लाख 38 हजार 106 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. उतारासुद्धा 12 टक्के होता. मात्र, यामध्ये मोठी वाढ झाली आहे. 2 कोटी 47 लाख 14 हजार 781 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे. 2 कोटी 90 लाख 82 हजार 154 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. अद्याप निम्मे साखर कारखाने सुरू आहेत. ते गळीत हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने देशातच नव्हे तर इतर महत्वाच्या देशांच्या तुलनेत अव्वल स्थान पटवकावले आहे. कोल्हापूर विभागात सुद्धा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. यामध्ये एकूण 36 कारखाने आहेत. त्यापैकी 23 कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. राज्याच्या एकूण उत्पादन तसेच गाळपात कोल्हापूर जिल्हाच अव्वल स्थानी आहे.
ऊस उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम देशातील साखरेचे गणित -देशात यावर्षी साखरेचे उत्पादन वाढले आहे. सद्यस्थितीत 290 लाख टनाहून अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यापैकी 250 ते 260 मेट्रिक टन इतकी साखरेची देशाला गरज आहे. त्यापैकीसुद्धा केवळ 30 टक्केच साखर घरगुती वापरासाठी वापरली जाते. इतर साखर ही उद्योगांसाठी लागते. सरकारनेसुद्धा आता इथेनॉल निर्मितीकडे वळण्याबाबत सूचना दिल्या आहेत. येत्या 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल निर्मितीकडे वळणार असल्याचे म्हटले आहे. सद्यस्थितीत केवळ 10 टक्क्यांपर्यंत इथेनॉल निर्मिती सुरू आहे. 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल उत्पादन होईल. मात्र या दरम्यान च्या कालावधीत काय करायचे हा प्रश्न कारखानदारांसमोर आहे.
जास्तीचे उत्पादन नेहमीच कारखामदारांसाठी अडचणींचा प्रश्न असतो. अशा वेळी जास्तीत जास्त साखर निर्यात करण्याचे सरकारने निर्णय घेतले पाहिजे. यावर्षीसुद्धा बऱ्यापैकी साखर निर्यात झाली आहे. त्याचा कारखानदारांना जरी फायदा होणार असला तरी प्रत्यक्षात मिळणारा दर हा 31 ते 32 रुपये इतका आहे. तो खुपच कमी आहे, असे साखर उद्योग अभ्यासक पी. जी. मेढे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. साखरेला जो हमीभाव दिला आहे, त्यामध्येसुद्धा हळूहळू वाढ केली पाहिजे. तरच साखर कारखान्यांना चांगले दिवस येतील असेही ते म्हणाले.
कोल्हापूर विभागातील टॉप 5 साखर कारखाने
कोल्हापूर विभागात सांगली तसेच कोल्हापूर हे दोन जिल्हे येतात. या दोन्ही जिल्ह्यात एकूण 36 कारखाने आहेत. त्यातील 26 कारखाने सहकारी तर 10 कारखाने खासगी आहेत. यामध्ये सर्वाधिक उत्पादन घेणारे तसेच सर्वाधिक गाळप केलेले कारखाने पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये देशात सर्वाधिक साखर उत्पादन तसेच गाळप करणाऱ्या साखर करखान्यामध्येसुद्धा कोल्हापूरातल्या इचलकरंजीमधील जवाहर साखर कारखान्याचा नंबर लागला आहे.
1) जवाहर साखर कारखाना इचलकरंजी : एकूण गाळप - 19 लाख 7 हजार 298 मेट्रिक टन, एकूण साखर उत्पादन - 23 लाख 13 हजार क्विंटल.
2) तात्यासाहेब कोरे साखर कारखाना वारणानगर : एकूण गाळप - 13 लाख 12 हजार 860 मेट्रिक टन, एकूण साखर उत्पादन - 14 लाख 30 हजार 850 क्विंटल.
3) श्री. दत्त साखर कारखाना, शिरोळ : एकूण गाळप - 12 लाख 81 हजार 990 मेट्रिक टन, एकूण साखर उत्पादन - 15 लाख 65 हजार 500 क्विंटल.
4) दालमिया भारत शुगर, आसूर्ले-पोर्ले : एकूण गाळप - 11 लाख 3 हजार 830 मेट्रिक टन, एकूण साखर उत्पादन - 13 लाख 51 हजार 600 क्विंटल.
5) श्री. छत्रपती शाहू कारखाना : एकूण गाळप - 10 लाख 77 हजार 459 मेट्रिक टन, एकूण साखर उत्पादन - 12 लाख 32 हजार 450 क्विंटल.