महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mahabhishek Ambabai : क्षीरसागर समर्थकांचा अंबाबाईला महाभिषेक; राज्यात सुख समृद्धी नांदू दे

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshirsagar ) तसेच कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी आज आई अंबाबाईला ( Ambabai ) महाभिषेक घातला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्याची भरभराट होऊन, राज्यात सुख समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना त्यांनी केली.

By

Published : Jul 3, 2022, 6:57 PM IST

Kshirsagar supporters pray to Ambabai
क्षीरसागर समर्थकांचे अंबाबाईला साकडे; राज्यात सुख समृद्धी नांदू दे

कोल्हापूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकीर्दीतील अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस होता. तत्पूर्वी आज सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshirsagar ) तसेच कोल्हापूर शिवसैनिकांच्या वतीने आई अंबाबाईला ( Ambabai ) महाभिषेक घालण्यात आला. शिवाय एकनाथ शिंदे सरकारच्या ( Chief Minister Eknath Shinde ) काळात महाराष्ट्र राज्याची भरभराट होऊन राज्यात सुख समृद्धी नांदू दे असे साकडेही अंबाबाईला घालण्यात आले. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्याची भरभराट होऊन राज्यात सुख समृद्धी नांदू दे, पुढील अडीच वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना - भाजप युतीचे स्थिर सरकार महाराष्ट्राला लाभू दे, शिंदे सरकारच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचा विकास होवू दे असे साकडे कोल्हापुरच्या शिवसैनिकांसह राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अंबाबाईला घातले.

क्षीरसागर समर्थकांचा अंबाबाईला महाभिषेक;

हेही वाचा -Speaker Faces Difficulties : नियुक्ती होताच विधानसभा अध्यक्षां पुढे अडचणी

दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणुक पार पडली यात भाजपचे उमेदवार राहूल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी भाजप, शिंदे गटाचे उमेदवार नार्वेकर यांना 164 मत मिळाली. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी 107 मते मिळाली. तर तीन आमदारांनी तटस्थ भुमिका घेतली. शिवसेनेचे बंडखोर नेतेएकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपालांनी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलाविले ते आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान ( Maharashtra Assembly Speaker election ) प्रक्रिया पार पडली. यात नर्वेकर यांचा विजय झाला.

राजकारणातील अनपेक्षित घडामोडी?शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सरकार स्थापन केले व मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. या नाट्यमय घडामोडी अजून संपलेल्या नाही आहेत. कधी नव्हे असा चमत्कार राज्याच्या राजकारणात सुरू आहे. ज्यांनी हे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सगळीकडे रंगली होती. मात्र, तसे झाले नाही. आतापर्यंतचा मागील इतिहास बघता विधानसभा अध्यक्षपदी सभागृहातील ज्येष्ठ, वरिष्ठ सदस्याची विधानसभा अध्यक्ष पदी नेमणूक केली जाते. पण भाजपने आमदार राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. नार्वेकर यांची आमदारकीची पहिलीच टर्म आहे. ते वकील असल्याकारणाने त्यांना अध्यक्ष पद दिले गेले आहे. म्हणून सध्याच्या राजकारणातील या सर्व घडामोडी अनपेक्षितपणे घडत असताना अजून किती धक्के बसणार आहेत हे पाहणे गरजेचे असणार आहे.

हेही वाचा -Legislative Special Session : अध्यक्ष सगळ्यांना समान न्याय देतील - मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details