महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maha Weather Update : राज्यात सकाळपासून ढगाळ वातावरण; अनेक भागांना अवकाळीचा धोका - कोल्हापूर लेटेस्ट न्यूज

राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला असताना राज्यातील ( Maha Weather Update ) काही ठिकाणी आज सकाळपासून ठगाळ वातावरण ( Cloudy weather in state ) आहे. तर कोल्हापुरात काही भागात तर पावसाच्या हलक्या सरी सुद्धा कोसळत आहेत.

Maha Weather Update
कोल्हापुरात पाऊस

By

Published : Mar 12, 2022, 1:40 PM IST

Updated : Mar 12, 2022, 1:54 PM IST

कोल्हापूर - राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला असताना राज्यातील ( Maha Weather Update ) काही ठिकाणी आज सकाळपासून ठगाळ वातावरण ( Cloudy weather in state ) आहे. तर कोल्हापुरात काही भागात तर पावसाच्या हलक्या सरी सुद्धा कोसळत आहेत. अगदी मान्सूनपूर्व वातावरणासारखेच वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाच्या मोठ्या सरी तसेच गारांच्या पावसाची सुद्धा शक्यता असल्याचे हवामान तज्ञ शंतनू पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यात सकाळपासून ढगाळ वातावरण

अनेक भागांना अवकाळीचा धोका -

आज महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता आहे, तर काही भागात अवकाळी पाऊस पडू शकतो असा हवामान खात्याच्या मुंबई कार्यालयाने अंदाज वर्तवला आहे.

कोल्हापुरातील या भागात पावसाची शक्यता (kolhapur Weather Update) -

दरम्यान, काल शुक्रवारी सुदधा सकाळी अशाच पद्धतीने जिल्ह्यातील काही भागात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आज शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले असून सातारा, कराड, सांगली, मिरज, सोलापूर, सावंतवाडी, कोल्हापूर शहरासह आजरा, चंदगड तसेच निपाणी भागात पावसाची शक्यता आहे.

कोल्हापुरात पाऊस

अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या -

एकीकडे राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला असताना कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात मात्र ढगाळ वातावरण आहे. कोल्हापूर शहरात सुद्धा अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असून सायंकाळपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा -Fire In Delhi : दिल्लीत झोपड्यांना लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू

Last Updated : Mar 12, 2022, 1:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details