कोल्हापूर - यावर्षी 2019 पेक्षाही मोठा महापूर झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे 1 हजार 50 कोटीहून अधिक रकमेचे नुकसान झाले असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसला असून एकूण 58 हजार 997 हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले आहे. दरम्यान,अतिवृष्टीमुळे विविध मार्गाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून आगामी काही दिवसात ही प्रक्रिया पुर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिली आहे. दरम्यान, सद्यःस्थितीत शासनाकडून 17 कोटी 42 लाख 5 हजार इतका निधी प्राप्त झाल्याची माहिती सुद्धा रेखावार यांनी दिली आहे.
जिल्ह्यात 71 हजार 289 इतकी पुरबाधित कुटुंबसंख्या -
जिल्ह्यातील पुरस्थितीची माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, सध्या जिल्ह्यात पुरबाधित क्षेत्रात पंचमाने सुरू आहेत. जिल्ह्यातील पुरबाधितांना सानुग्रह अनुदानासाठी आगाऊ मदत म्हणून शासनाकडून 17 कोटी 42 लाख 5 हजार इतका निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात 71 हजार 289 इतकी पुरबाधित कुटुंबसंख्या असून त्यापैकी 61 हजार 864 इतक्या जणांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अतिवृष्टीमुळे 5 हजार 789 घरांची अंशता तर 1 हजार 107 घरांची पूर्ण पडझड झाली आहे. त्यापैकी अनुक्रमे 5 हजार 103 व 809 इतके पंचमाने पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील 2 हजार 466 गोठा पडझडी पैकी केवळ 646 पंचनामे शिल्लक राहिले आहेत, तर 12 हजार 157 दुकानधारकांपैकी सुमारे 9 हजार 675 जणांचे पंचनामे पूर्ण आहेत, अशी माहिती सुद्धा जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली.
कोल्हापूरला महापुराचा फटका; जिल्ह्यात सुमारे 1 हजार कोटीहून अधिक नुकसान
कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या महापुरात सुमारे 1 हजार कोटीहून अधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पुरबाधितांना सानुग्रह अनुदानासाठी आगाऊ मदत म्हणून शासनाकडून 17 कोटी 42 लाख 5 हजार इतका निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात 71 हजार 289 इतकी पुरबाधित कुटुंबसंख्या असून त्यापैकी 61 हजार 864 इतक्या जणांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अतिवृष्टीमुळे 5 हजार 789 घरांची अंशता तर 1 हजार 107 घरांची पूर्ण पडझड झाली आहे. त्यापैकी अनुक्रमे 5 हजार 103 व 809 इतके पंचमाने पूर्ण झाले आहेत.
कोल्हापूरला महापुराचा फटका
दरम्यान, या आपत्तीमध्ये 161 जनावरांचा मृत्यू झाला असून, 13 कुटुंबातील सुमारे 15 हजार 178 इतक्या पोल्ट्री पक्षांचा पंचनामा पूर्ण झाला आहे. हस्तकला, हातमाग, क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 1 हजार 169 कारागीरांपैकी 941 जणांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.