कोल्हापूर Kolhapur स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव Amrit Mahotsav Of Independence देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोल्हापूरात सुद्धा अमृतमहोत्सव मोठया उत्साहात साजरा झाला. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक उपक्रम झाले काहींनी अनोख्या पद्धतीने पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृतमहोत्सव खास बनवला त्यातील काही महत्वाच्या उपक्रमांवर एक नजर
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण संविधान स्तंभाचे अनावरणभारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील Higher and Technical Education Minister Chandrakant Patil यांच्या हस्ते झाले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या संविधान स्तंभाची उंची 15 फूट आहे.
64 व्या वर्षी रंकाळ्याभोवती 17 प्रदक्षिणा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी सलग 75 किलोमीटरचे अंतर धावण्याचा विक्रम कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महिपती शंकर संकपाळ यांनी पूर्ण केला. रंकाळा तलावाभोवती 17 प्रदक्षिणा मारून त्यांनी 75 किलोमीटरचे अंतर 9 तास 9 मिनिटे 29 सेकंदात पूर्ण केले. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी हा विक्रम करून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मध्यरात्री 12 च्या सुमाराला सुरू करण्यात आलेला हा उपक्रम सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला पूर्ण करण्यात आला.
स्वातंत्र्यदियानिमित्त अंबाबाई मंदिरात विशेष पूजा स्वातंत्र्यदियानिमित्त अंबाबाई मंदिरात Ambabai Temple Kolhapur puja विशेष पूजा करण्यात आली. हातात तिरंगा तसेच गाभाऱ्यात देशाच्या नाकाशातून देवीचे दर्शन होत होते. देवीच्या मागे सुद्धा तिरंगाचे पोस्टर लावण्यात आले होते.
पुराच्या पाण्यातून पोहत फडकविला तिरंगास्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शिरोळ तालुक्यातील काही जलतरण मंडळाच्या सदस्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. येथील शिरोळ तालुक्यातील उदगाव मधील कृष्णामाई जलतरण मंडळाच्या सदस्यांनी आज 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्त हातात तिरंगा ध्वज घेऊन मिरज येथील हरिपूर मधील कृष्णा वारणा नदीच्या संगमापासून ते शिरोळ तालुक्यातील उदगाव पर्यंत तब्बल 9 किलोमीटर पोहत पार केले. कोल्हापूरातील सुद्धा काही जणांनी मिळून बलिंगा पूल ते कोल्हापूर शिवाजी पूल तब्बल 22 किलोमीटर अंतर हातात तिरंगा घेऊन पोहत पार केले.
बोबड्या बोलमध्ये स्वातंत्र्यदिनाचे भाषण चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरललहानपणी स्वातंत्र्यदिनादिवशी अनेकांनी भाषण केली असतील. अशाच एका चिमुकलीचा एक व्हिडिओ कोल्हापूरात व्हायरल झाला. ज्यामध्ये तिची आई तिच्याकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण पाठ करून घेत आहे. विराज्ञी सुरज हुकिरे असे या चिमुकलीचे नाव असून हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली मधील ती आहे. आपल्या बोबड्या बोलद्वारे स्वतंत्रदिनाचे भाषण पाठ करताना चिमुकलीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.