महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापूरकरांना दिलासा.. रविवारपासून कडक लॉकडाऊन शिथील, वाचा काय सुरू अन् काय राहणार बंद - कोल्हापूर लॉकडाऊन

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने उद्या रात्रीपासून (रविवार) लॉकडाऊन शिथिल केल्याची घोषणा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी याबाबतचा नवीन आदेश काढला असून उद्या रात्री 12 पासून 1 जूनपर्यंत हे नवीन नियम लागू असणार आहेत.

lockdown kolhapur
lockdown kolhapur

By

Published : May 22, 2021, 10:13 PM IST

कोल्हापूर - वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 8 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. वाढती रुग्णसंख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवतील का, असा अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र जिल्हा प्रशासनाने उद्या रात्रीपासून (रविवार) लॉकडाऊन शिथिल केल्याची घोषणा केली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज सायंकाळी याबाबतचा नवीन आदेश काढला असून उद्या रात्री 12 पासून 1 जूनपर्यंत हे नवीन नियम लागू असणार आहेत.


सोमवारपासून काय सुरू आणि काय राहणार बंद ? -

1) किराणा दुकान, भाजीपाला, दूध डेअरी, दूध विक्री, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य दुकाने, चिकन, मटण, मांस विक्री सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र हे व्यवसाय केवळ सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवता येणार असून त्यांना सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत घरपोच सेवाही देता येणार आहे.

2) सर्व वाहतूक व्यवस्था, विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा, सार्वजनिक बसेस (50 टक्के क्षमतेने), मालाची/वस्तूंची वाहतूक, कार्गो सेवा, ई कॉमर्स

3) बँकिंग सेवा, विमा आणि मेडिक्लेम कार्यालय, मायक्रो फायनान्स कार्यालय, नॉन बँकिंग वित्तीय कार्यालय

4) सर्व शासकीय कार्यालय (राज्य, केंद्र, स्थानिक प्राधिकरण) 15 टक्के कर्मचारी/ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार.

5) रेस्टॉरंट, हॉटेल मधून केवळ घरपोच सेवा देता येणार. कोणालाही हॉटेलमध्ये बसून खाता येणार नाही. ज्या हॉटेलमध्ये बाहेरगावाहून आलेले प्रवासी राहिले असतील त्यांनाच बसून खाण्याची परवानगी. नियमांचा भंग केल्यास 10 हजारांची दंडात्मक कारवाई होईल.

6) रस्त्याच्या बाजूला बसून खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांनी त्या ठिकाणी केवळ पार्सल सेवा देण्याच्या सूचना आहेत. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत ही सेवा त्यांना देता येणार आहे.

7) सर्व उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कामगारांच्या राहण्याची व्यवस्था कंपनी मालकाने करायचे आदेश असून केवळ 50 टक्के क्षमतेने कारखाने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

8) सिनेमागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क, गार्डन, व्हिडिओ गेम पार्लर, क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, शॉपिंग मॉल, केश कर्तनालय, सलून, स्पा, ब्युटी पार्लर यासह सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत.

9) सर्वात महत्वाचे म्हणजे लग्न समारंभाला परवानगी देण्यात आली असून केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करता येणार आहेत. विशेष म्हणजे 2 तासांमध्येच लग्न समारंभ पार पाडायचा आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास 50 हजारांचा दंड सुद्धा वसूल करण्यात येणार आहे. अंत्यविधीसाठी सुद्धा केवळ 20 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी नसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details