महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष : असा असतो कोल्हापुरातला ऐतिहासिक शाही दसरा सोहळा - lets know about royal Dussehra celebrations of kolhapur

म्हैसूरनंतर कोल्हापूरात साजरा होणारा दसरा सोहळा संस्थानकाळातील परंपरेची आजही साक्ष देतो. त्यामुळेच हा सोहळा पाहण्यासाठी अवघे कोल्हापूर याठिकाणी येत असते.

असा असतो कोल्हापुरातला ऐतिहासिक शाही दसरा सोहळा
असा असतो कोल्हापुरातला ऐतिहासिक शाही दसरा सोहळा

By

Published : Oct 15, 2021, 4:45 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूरचा नवरात्रोत्सव आणि इथल्या ऐतिहासिक शाही दसरा सोहळ्याला एक वेगळं महत्व आहे. देशभरात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र म्हैसूरनंतर कोल्हापूरात साजरा होणारा दसरा सोहळा संस्थानकाळातील परंपरेची आजही साक्ष देतो. त्यामुळेच हा सोहळा पाहण्यासाठी अवघे कोल्हापूर याठिकाणी येत असतात. खरंतर कोल्हापुरातील हा सोहळा देशभरात एक प्रमुख सोहळा म्हणूनही ओळखला जातो. कसा असतो हा सोहळा आणि काय आहे नेमकी परंपरा यावर प्रकाश टाकणारा आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा विशेष रिपोर्ट...

असा असतो कोल्हापुरातला ऐतिहासिक शाही दसरा सोहळा
अनेक वर्षांची परंपरा असेलेला शाही सोहळाकोल्हापूरात साजरा होणारा शाही दसरा सोहळा देशभरात ओळखला जातो. नवरात्रोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच विजयादशमी. याच दिवशी कोल्हापूरातल्या दसरा चौक मधील मैदानात भव्य दिव्य असा शाही दसरा सोहळा संपन्न होत आला आहे. याला अनेक वर्षांची परंपरा आहे. कालानुरूप यामध्ये काही बदल होत गेले मात्र आजही येथील छत्रपती घराण्याने ही परंपरा जपली असून तोच उत्साह आणि शानदार सोहळा इथले नागरिक अनुभवतात.
असा असतो कोल्हापुरातला ऐतिहासिक शाही दसरा सोहळा
हत्ती, घोडे, उंट यांच्यासह मोठा लवाजमा सोहळ्यात असायचा सहभागीपूर्वी कोल्हापुरातील या सोहळ्यात हत्ती, घोडे, उंट आदीसह मोठा लवाजमा घेऊन छत्रपती घराणे या सोहळ्यात सहभागी होत होते. आजही तोच उत्साह, राजेशाही थाट आणि सोहळ्याची परंपरा जपली आहे. सध्या यामध्ये काळानुसार काही बदल झाले आहेत. पूर्वी जुना राजवाडा येथून शाही लवाजमा निघायचा. आता न्यू पॅलेस येथून छत्रपती घराण्यातील सर्वच सदस्य यामध्ये श्रीमंत शाहू छत्रपती, युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे आणि यशराजे हे एका 'मेबॅक' मोटारीतून या सोहळ्याला येत असतात. त्यांचे बँड पथकाने स्वागत केले जाते. पूर्वी हाच सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जात होता. या सोहळ्याची भव्यता आणि उंची ही तितकीच मोठी होती.
असा असतो कोल्हापुरातला ऐतिहासिक शाही दसरा सोहळा

भवानी मंडप येथुन शाही मिरवणुकीला सुरुवात होत होती. या मिरवणुकीत सजवलेले हत्ती, घोडे, उंट आदी भव्य लवाजमा असायचा. सोबत अनेक पारंपरिक वाद्य, यामध्ये विशेष म्हणजे तुतारी वादक सुद्धा असायचे. यामध्ये अंबाबाईची पालखी सोबत भवानी देवीसह गुरू महाराज यांची पालखी असे. याबरोबरच सर्वच मानकरी, इनामदार, जहागीर, अधिकारी आदींची यामध्ये उपस्थिती असायची. सायंकाळच्या सुमारास ही मिरवणूक निघून साडे सहा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथे फोहोचत असे.

असा असतो कोल्हापुरातला ऐतिहासिक शाही दसरा सोहळा
गेल्या काही वर्षांपासून छत्रपती घराण्यातील सदस्य 'मेबॅक' येतात मोटारीतून दसरा चौकात; आजही तोच उत्साह दसरा सोहळ्याला जो पूर्वीचा थाट आणि भव्यता होती, त्यामध्ये काही बदल झाले असून सोहळ्याचा उत्साह आणि परंपरा मात्र आजही या सोहळ्याची उंची वाढवतात. अवघे कोल्हापूर या ठिकाणी एकवटलेले असते. कोल्हापूर आणि इथला शाही दसरा सोहळा एक वेगळं समीकरणच आहे. याची संपूर्ण देशभरात वेगळी ओळख आहे. पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात हत्ती, घोडे, उंट आदी जरी या मिरवणुकीत सहभागी होत नसले तरी गेल्या काही वर्षांपासून छत्रपती घराणे न्यू पॅलेस येथून एका विदेशी 'मेबॅक' मोटारीतून दसरा चौक येथील सोहळ्याच्या ठिकाणी दाखल होत असतात. त्यांच्या समोर ट्रॅफिक पोलिसांनी छत्रपती घराण्यातील सर्वच सदस्य, मानकरी आदी सर्वजण पारंपरिक पोशाखात सोहळ्यात सहभागी होत असल्याने सोहळ्याची अधिकच उंची वाढते.
असा असतो कोल्हापुरातला ऐतिहासिक शाही दसरा सोहळा

दरवर्षी सायंकाळी साडे सहा वाजता इथला शमीपूजनाचा कार्यक्रम पार पडत असतो. तत्पूर्वी रितिरिवाजानुसार करवीर निवासिनी आई अंबाबाईची पालखी सोबत भवानी देवी आणि गुरू महाराज यांची पालखी लावजम्यासह आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात दसरा चौक येथे दाखल होते. यावेळी हवेत बंदुकीच्या गोळ्या झाडत हा लवाजमा मैदानात दाखल होतो. या सोहळ्यासाठी एक भव्य शामियाना उभारण्यात येतो. यामध्ये छत्रपती घराण्यासह निमंत्रित व्यक्तींची आसन व्यवस्था केली जाते. यावेळी साडे सहा वाजल्यानंतर छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या हस्ते शमीच्या पानांचे केले जाते. त्यानंतर काही क्षणातच सोने लुटण्यासाठी कोल्हापुरकरांची एकच झुंबड उडत असते. हा सोहळा पार पडल्यानंतर छत्रपती घराण्यातील सदस्य कोल्हापूर वासीयांना सोने देत दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर सर्व पालख्या आणि छत्रपती घराण्यातील सर्वजणच पुन्हा परत न्यू पॅलेस कडे रवाना होतात. आजही ही परंपरा जपली असून सर्वजण आतुरतेने या सोहळ्याची वाट पाहत असतात. यंदाही हा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून पार पडणार आहे.

असा असतो कोल्हापुरातला ऐतिहासिक शाही दसरा सोहळा

हेही वाचा -कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा यंदा कोरोनामुळे रद्द

ABOUT THE AUTHOR

...view details