महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Leena Nair Kolhapur : लीना नायर यांचा कोल्हापूर ते 'शनैल'च्या सीईओपर्यंतचा प्रवास..

गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर यांसारख्या मोठ्या ब्रँडचे प्रमुख भारतीय वंशाचे नागरिक आहेत. आता पुन्हा यात भर पडली आहे. भारतीय वंशाच्या लीना नायरला (Leena Nair CEO Chanel From Kolhapur) जागतिक दर्जाच्या फ्रेंच फॅशन डिझायनिंग फ्रान्समधल्या लक्झरी ग्रुप शनैलचे सीईओ ( Leena Nair is the CEO of French fashion brand Chanel )बनवण्यात आले आहे. ही भारतीयांसाठी आणखी एक अभिमानाची बाब आहे.

Leena Nair
लीना नायर

By

Published : Dec 15, 2021, 7:13 AM IST

Updated : Dec 15, 2021, 12:21 PM IST

कोल्हापूर -मूळच्या भारताच्या असणाऱ्या 52 वर्षीय लिना नायर ( Leena Nair CEO Chanel From Kolhapur) फ्रान्समधल्या लक्झरी ग्रुप शनैलच्या जागतिक सीईओ ( Leena Nair is the CEO of French fashion brand Chanel ) बनल्या आहेत. लीना यांनी कोल्हापूरातील 'होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल'मध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. लीना गेल्या 30 वर्षांपासून युनिलीवर कंपनीमध्ये CHRO म्हणून कार्यरत होत्या. मात्र आज त्यांना नव्या पदाची जबाबदारी मिळाली असून नव्या वर्षांत त्या पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, त्यांना एव्हडी मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

सर्वात कमी वयाच्या म्हणून युनिलीवर मध्ये राहिल्या CHRO -
एक महिला आणि सर्वात कमी वयाच्या म्हणून युनिलीवरमध्ये लीना नायर यांनी CHRO म्हणून पदभार स्वीकारला होता. तब्बल 30 वर्षे त्यांनी या कंपनीमध्ये जाबाबदारी पार पाडली. त्यांच्या याच कार्याची दखल घेत शनेलने जगातील सीईओ पदाची मोठी जबाबदारी दिली आहे. याबाबत स्वतः लीना नायर यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. शिवाय सर्वांचे त्यांनी आभार सुद्धा मानले आहेत.

ट्विटरच्या माध्यमातून काय म्हंटले आहे लीना नायर यांनी?
लीना नायर यांची शनैलमध्ये जागतिक सोईओ पदाची जबाबदारी मिळताच त्यांनी आपल्याला ही जबाबदारी सोपावल्याबाबत आभार मानले आहेत. शिवाय शनैल (CHANEL) या प्रतिष्ठित आणि प्रशंसनीय कंपनीची जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली याचा आनंद सुद्धा होत आहे असेही त्यांनी म्हंटले आहे.

लीना नायर यांच्या प्रवासावर एक नजर -
लीना नायर या मूळच्या कोल्हापूरच्या, त्यांचे शालेय शिक्षण येथील होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी सांगलीमधील वालचंद कॉलेज येथे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी जमशेदपूर येथून व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्याठिकाणी त्यांना सुवर्ण पदक सुद्धा प्राप्त झाले होते. त्यानंतर त्यांनी थेट 1992 मध्ये HUL अर्थात हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून करियरला सुरूवात केली. त्यानंतर लिप्टन फॅक्टरीसह तीन वेगवेगळ्या कंपनीमध्ये तिने व्यवस्थापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लीना नायर 2013 मध्ये युनिलिव्हरच्या HR बनल्या. त्या कंपनीच्या विविधतेच्या जागतिक प्रमुख देखील बनल्या. त्यानंतर 2016 मध्ये त्या लंडनमधील ULE युनिलिव्हर लीडरशिप एक्झिक्युटिव्ह मध्ये सामील झाल्या. गेल्या अनेक वर्षांच्या त्यांच्या कार्याचा अनुभव पाहूनच त्यांना या नव्या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Last Updated : Dec 15, 2021, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details