कोल्हापूर - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 93व्या वर्षी ( Lata Mangeshkar Passes Away ) निधन झाले. ते गेल्या एक महिन्यापासून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान काल त्यांची तब्येत अचानक खालावली आणि आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने अनेक स्तरातून दुःख व्यक्त होत आहे. दरम्यान, मंगेशकर कुटुंब आणि कोल्हापूर ( Lata Mangeshkar Relation With Kolhapur ) याचे एक नाही, तर अनेक खास संबंध राहिले आहेत. आता त्यांच्या जाण्याने त्यांच्या कोल्हापुरातील आठवणींनादेखील उजाळा मिळत आहे. कोल्हापुरातील यादव कुटुंब आणि कारेकर कुटुंबाकडे ( Kolhapur Yadav And Karekar Family Relation With Lata Mangeshkar ) त्यांच्या खास आठवणी आहेत.
यादव-मंगेशकर कुटुंबाशी खास संबंध -
मुळचे सांगलीचे असलेले मंगेशकर कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपूर्वी कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे भाड्याच्या घरात राहण्यासाठी होते. ते दहा वर्ष इथे राहिले. कोल्हापुरातील लक्ष्मण कारेकर यांच्या घरी अवघ्या दहा रुपयाच्या भाड्यावर हे मंगेशकर कुटुंबीय राहत होते. तीन खोल्यांच्या या छोटेखानी भाड्याच्या घरात लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर , हृदयनाथ मंगेशकर या भावंडांचे बालपण गेले आहे. त्यावेळी आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबियांना कारेकर कुटुंबियांनी वेळोवेळी मदत ही केली होती. तर कोल्हापुरातील यादव कुटुंबीय यांच्याशी ही मंगेशकर कुटुंबाशी खास संबंध होते. लता मंगेशकर व त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपूर्वी कोल्हापुरातील पन्हाळागडावर चार-पाच दिवसांकरिता येत होते.