कोल्हापूर - सलग पाच ते सहा दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आज सकाळी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे. इशारा पातळी 39 फूट असून सध्याची पाणी पातळी 39 फूट 1 इंच इतकी झाली आहे. राधानगरी धरण सुद्धा 99 टक्के भरले असून काही वेळातच याचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच; पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे - कोल्हापूर-गगनबावडा
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघणार असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदी काठच्या सर्व गावांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच; पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे
मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्ग मंगळवारी बंद झाला होता. येथील मांडुकली गावाजवळ दीड फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, याठिकाणची पाणी पातळी कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघणार असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदी काठच्या सर्व गावांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.