महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर सकाळी 7 ते सायंकाळी 6 वेळेतच राहणार सुरू; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय - अंबाबाई मंदिरात सकाळी सायंकाळी 6 पर्यंतची दर्शनाची वेळ

कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर सकाळी 7 ते सायंकाळी 6 वेळेतच सुरू राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Kolhapur's Ambabai temple will be open from 7 am to 6 pm
कोल्हापूचे अंबाबाई मंदिर सकाळी 7 ते सायंकाळी 6 वेळेतच राहणार सुरू; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

By

Published : Mar 18, 2021, 9:33 PM IST

Updated : Mar 18, 2021, 10:00 PM IST

कोल्हापूर - राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवरती कोल्हापूरातील अंबाबाई मंदिराबरोबरच कोल्हापूर शहरातील सर्वच मंदिरामध्ये दर्शनाची वेळ बदलण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंतच आता अंबाबाईसह शहरातील मंदिर सुरू राहणार असून सायंकाळी 6 नंतर शहरातील सर्वच मंदिरे बंद करण्यात येणार आहेत. आज महानगरपालिकेमध्ये बैठक पार पडली यानंतर दिलेल्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर सकाळी 7 ते सायंकाळी 6 वेळेतच राहणार सुरू; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे तातडीची बैठक -

कोल्हापूरात कोरोना रुग्णसंखेमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. सद्या जिल्ह्यात जवळपास 380 पर्यंत ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आज सुद्धा तब्बल 62 नवे रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आयुक्त बलकवडे यांनी तातडीची बैठक बोलवली होती. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला शहरातील महत्वाच्या मंदिरांच्या वेळेत बदल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्व मंदिर सुरू ठेऊन सायंकाळी 6 नंतर कोणालाही दर्शन न देण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील ही मंदिरं सायंकाळी 6 ते सकाळी 7 या वेळेत दर्शनासाठी राहणार बंद -

अंबाबाई मंदिराबरोबरच कोल्हापूर शहरामध्ये ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिर, आझाद चौक येथील दत्त भिक्षालींग देवस्थान, महाद्वार रोड वरील बिनखांबी गणेश मंदिर, बागल चौक येथील पंचमुखी मारुती मंदिर, टेंबलाईवाडी येथील त्र्यंबोली देवस्थान त्याचबरोबर बालिंगा येथील कात्यायनी देवी मंदिरामध्ये सुद्धा भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. म्हणूनच या सर्वच मंदिरांमध्ये दर्शनाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत ठेवण्यात आली आहे. सायंकाळी 6 नंतर सर्वच मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात येणार असून कोणत्याही भक्ताला मंदिरात प्रवेश मिळणार .

Last Updated : Mar 18, 2021, 10:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details