महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Green Crackers : कोल्हापूरकरांचा 'ग्रीन क्रॅकर्स' खरेदीकडे कल; यंदा मोठी उलाढाल - ग्रीन फटाके

फटाक्यांमुळे वायू प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होत असते. यावर काही प्रमाणात नियंत्रण यावे यासाठी ग्रीन फटाके निर्माण करण्यात आले आहेत.

green crackers
ग्रीन फटाके

By

Published : Nov 3, 2021, 10:15 PM IST

कोल्हापूर - प्रकाशाचा सण म्हणून सर्वजण दिवाळी साजरी करतात. दिवाळी म्हटले की फटाके हे एक समीकरणच आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून फटाके फोडण्यावर अनेक बंधने आली आहेत. शिवाय पर्यावरणाला जास्त हानी पोहोचू नये यासाठी 'ग्रीन क्रॅकर्स' बनवण्यात आले आहेत. त्याच फटाक्यांचा सर्वांनी वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार कोल्हापूरकर 'ग्रीन क्रॅकर्स'ना पसंती देताना पाहायला मिळत आहेत.

ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा

हेही वाचा -बेघरांना दिवाळीचे साहित्य भेट; सांगली पोलिसांनी स्तुत्य उपक्रम

गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 2 तास फटाके फोडण्यासाठी परवानगी होती. त्यामुळे याला मर्यादा आल्या होत्या. शिवाय फटाक्यांची उलाढालसुद्धा कमी झाली होती. मात्र, यंदा कोरोना प्रादुर्भाव कमी असल्याने 2 तासांचे बंधन घालण्यात आले नाही. पाहुयात यावरचा आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा विशेष रिपोर्ट...

  • 'ग्रीन क्रॅकर्स' म्हणजे काय?

फटाक्यांमुळे वायू प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होत असते. यावर काही प्रमाणात नियंत्रण यावे यासाठी ग्रीन फटाके निर्माण करण्यात आले आहेत. ग्रीन फटाके म्हणजे आवाजाची मर्यादा तसेच फटाक्यांमधून निघणाऱ्या धूरावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण राहते. परिणामी 30 ते 40 टक्के प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होत असते. ग्रीन फटाक्यांमध्ये कमी हानीकारक घटक असतात. म्हणूनच ग्रीन फटाक्यांना मान्यता दिली असून त्यामुळे प्रदूषणात घट होताना पाहायला मिळत असते.

  • कमी आवाजाचे आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार असे फटाके द्या :

अनेकांना प्रदूषणाची समस्या निर्माण होऊ नये असे वाटत असते. मात्र, घरातील लहान मुलांच्या हट्टापायी शेवटी त्यांना फटाके घेऊन यावे लागते. त्यामुळे असे जागृत नागरिकसुद्धा फटाक्यांची खरेदी करत असताना. शासनाने ज्या फटाक्यांना मान्यता दिली आहे त्या ग्रीन फटाक्यांची मागणी करतात. ग्रीन फटाक्यांबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली नसली तरी, सध्या शहरात अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर ग्रीन फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. येथील निर्माण चौक येथील ग्राउंड तसेच आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदान, राजारामपुरी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत.

  • गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठी उलाढाल :

गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घालण्यात आले होते. दिपावलीच्या दोन दिवस आधीपर्यंत फटाके उडवण्यासाठी परवानगी नाकारली होती. काही निर्बंध घालत केवळ सात ते नऊ या वेळेमध्येच फटाके उडवण्याची परवानगी दिली होती. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भावसुद्धा कमी झाल्याने असे कोणतेही बंधन घालण्यात आले नाही. रात्री दहापर्यंत फटाके फोडता येणार असून नागरिकसुद्धा गतवर्षीच्या तुलनेत यंदा फटाके खरेदी करण्यासाठी बाहेर पडले आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा अनेक ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्यातून लाखोंची उलाढाल होईल अशी शक्यता आहे.

हेही वाचा -Diwali 2021 : प्लास्टिकचा वापर टाळत कागदी आकाशकंदील बाजारात

ABOUT THE AUTHOR

...view details