कोल्हापूर :आमदार नितेश राणे यांनी शिवसेना, ठाकरे कुटुंबाच्या बाबतीत तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्याबाबत व्यक्तव्य केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील युवासेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली. कोल्हापूरातल्या युवसेनेच्या वतीने मिरजकर तिकटी येथे निलेश राणे यांच्या पोस्टरला जोडे मारून, तर शिरोळमधल्या कुरुंदवाड शहरातील भालचंद्र थिएटर चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी राणे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.
राणे यांनी माफी मागावी..
नितेश राणे यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. तसेच ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राणे यांनी जाहीर माफी मागावी; अन्यथा यापुढेही नितेश राणे यांच्या विरोधात मार्चा, आंदोलने करू असा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात राणे यांच्या आरोपानंतर त्याचे पडसाद उमटले आहेत. कोल्हापूरातल्या ठिकठिकाणी आंदोलन करत त्याचा निषेध करण्यात आला. कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी येथे शिवसैनिकांनी राणे यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केले तर शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड मधील भालचंद्र थिएटर चौकात राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कोल्हापूर युवासेना जिल्हाप्रमुख मंजीत माने, विधानसभा अधिकारी सागर पाटील, उपजिल्हा अध्यक्ष अक्षय चाबूक, शिरोळ मध्ये युवासेना तालुका अध्यक्ष प्रतिक धनवडे, उपतालुका अध्यक्ष मंगेश पाटील, वैभव गुजरे, शिवसेना कुरुंदवाड शहरप्रमुख बाबासो सावगावे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.