महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

22 वर्षांपासून केबीसीत जाण्याचा प्रयत्न, शेवटी करोडपती होऊन दाखवले; कोल्हापुरातील कविता चावला यांची exclusive मुलाखत - कोल्हापूर कविता चावला न्यूज

गेल्या 22 वर्षांपासून म्हणजेच जेव्हा केबीसी शो सुरू झाला. अगदी तेव्हापासून कविता चावला ( Kavita Chawla becomes first crorepati ) प्रयत्न करत होत्या. त्यांची 2013 सालीसुद्धा टॉप 10 मध्ये निवड झाली होती. मात्र त्यांना पुढे जाता आले नाही. मात्र, आता त्यांना पुन्हा केबीसीमध्ये जाण्याची तर संधी भेटलीच शिवाय  हॉटसीटवरसुद्धा बसण्याची संधी भेटली. तब्बल 1 कोटींची रक्कम त्यांनी जिंकली आहे.

कोल्हापुरातील कविता चावला यांची exclusive मुलाखत
कोल्हापुरातील कविता चावला यांची exclusive मुलाखत

By

Published : Sep 19, 2022, 7:47 PM IST

Updated : Sep 19, 2022, 9:27 PM IST

कोल्हापूर - कौन बनेगा करोडपतीमध्ये जाण्याचे आणि आणि तिथे जाऊन करोडपती होण्याचे अनेकजण स्वप्न पाहात असतात. हेच स्वप्न कोल्हापुरातल्या गांधीनगर येथील एका गृहिणीने सत्यात उतरवून दाखवले आहे. कारण यंदाच्या 14 व्या सीझनमध्ये गांधीनगरमधील कविता चावला ( Kavita Chawla Kaun Banega Crorepati ) 1 कोटी रुपये जिंकून करोडपती बनल्या आहेत. कोण आहेत कविता चावला आणि कशा पद्धतीने त्यांचा हा संपूर्ण प्रवास होता याबाबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने ( Kavita Chawla exclusive interview ) मुलाखत केली आहे.



22 वर्षांपासून सुरू होते प्रयत्नगेल्या 22 वर्षांपासून म्हणजेच जेव्हा ( Kavita Chawla becomes first crorepati ) केबीसी शो सुरू झाला. अगदी तेव्हापासून कविता चावला प्रयत्न करत होत्या. त्यांची 2013 सालीसुद्धा टॉप 10 मध्ये निवड झाली होती. मात्र त्यांना पुढे जाता आले नाही. मात्र, आता त्यांना पुन्हा केबीसीमध्ये जाण्याची तर संधी भेटलीच शिवाय हॉटसीटवरसुद्धा बसण्याची संधी भेटली. तब्बल 1 कोटींची रक्कम त्यांनी जिंकली आहे. केवळ 12 शिक्षण झालेल्या चावला यांनी अनेक वर्षांपासून केबीसीमध्ये जाण्याचे एकच ध्येय ठेवले होते. त्यानुसार त्या घरीच सगळी कामे करून त्याची तयारी करत होत्या. शेवटी 22 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे नक्कीच 'कोशीश करणे वालों कीं कभी हार नही होती' असे कविता चावला यांनी म्हटले आहे.

कोल्हापुरातील कविता चावला यांची exclusive मुलाखत


मुलाच्या शिक्षणासाठी जिंकलेल्या पैशांचा वापर करणारकविता चावला यांच्या मुलाचे बीसीए झाले आहे. त्याला पुढील शिक्षणासाठी युकेला जायचेच होते. त्यासाठी त्यांनी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते. त्यातच त्यांचा केबीसीमध्ये नंबर लागला. त्यामध्ये 1 कोटींची रक्कम जिंकत करोडपती बनल्या आहेत. पती विजय चावला यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे. अंगावर काही कर्जसुद्धा आहे. मात्र आता या विजयानंतर कुटुंबीय सुद्धा मोठ्या आनंदात आहेत, असे पती विजय चावला यांनी म्हटले आहे.



केबीसीमधून परत आल्यानंतर गांधीनगरमध्ये कुटुंबियांकडून जल्लोषात स्वागत - 19 सप्टेंबर आणि 20 सप्टेंबर रोजी केबीसीमधील एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. मात्र जेव्हा त्या या शोमधून करोडपती होऊन परत आल्या. तेव्हा गांधीनगरमधील त्यांच्या नातेवाईकांनी, कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या तालावर कविता चावला यांचे जल्लोषात स्वागत केले.



अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्याची संधी एक अविस्मरणीय क्षण - ज्या गोष्टीची गेल्या 22 वर्षांपासून वाट पाहत होते, ती प्रत्यक्षात सत्य झाली. तेव्हा विश्वास बसत नव्हता. 1 कोटींची रक्कम जिंकणे हे जरी आनंदाची गोष्ट असली तरी अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. हे सुद्धा अविस्मरणीय क्षण असल्याचे चावला यांनी म्हटले आहे. शिवाय 1 कोटींची रक्कम जिंकताच तुम्ही संपूर्ण कोल्हापूरकरांना अभिमान वाटावा असे काम केले असल्याचेही गौरवोद्गार काढल्याचे कविता चावला यांनी 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत म्हटले आहे.

Last Updated : Sep 19, 2022, 9:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details