महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kolhapur Rain : मान्सूनपूर्व पावसातच कोल्हापूर तुंबलं; अर्धवट नालेसफाईच्या कामाला जबाबदार कोण? - Kolhapur flooded pre monsoon rains

2 जूनला आलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण कोल्हापुरात धुमाकूळ घातला. शहरातील अनेक भागात पावसाने कंबरे एवढं पाणी साचले, तर काही ठिकाणी झाडेही ( Kolhapur was flooded during pre monsoon rains ) पडली.

Kolhapur Rain
Kolhapur Rain

By

Published : Jun 3, 2022, 10:53 PM IST

कोल्हापूर -कोल्हापूरकरांनी आतापर्यंत 3 वेळा महापुराचा सामना केला आहे. २००५, २०१९ आणि २०२१ या तिन्ही वर्षात अर्धे कोल्हापूर पाण्याखाली होते. २०१९ मध्ये तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली. आता हे सर्व सांगायचं कारण म्हणजे आता पावसाळा सुरू होत आहे. 2 जूनला आलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण कोल्हापुरात धुमाकूळ घातला. शहरातील अनेक भागात पावसाने कंबरे एवढं पाणी साचले, तर काही ठिकाणी झाडेही पडली. त्यामुळे शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. त्यात आता महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाई, ड्रेनेज सफाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. नालेसफाईची कामे झाली असती तर, पहिल्याच पावसात कोल्हापूरची ही स्थिती झाली नसती, असा सूर नागरिकांमधून उमटत ( Kolhapur was flooded during pre monsoon rains ) आहे.

पहिल्याच पाऊसात शहरात अनेक ठिकाणी पाणी - 2 जूनला कोल्हापुरात अवकाळी पावसाने हजरे लावली. सायंकाळच्या सुमारास आलेल्या या पावसाने शहरात पाणी तुंबले, अनेक ठिकाणी पडझड झाली, गाड्यांचे नुकसान झाले. कुंभार गल्ली, राजारामपुरी, परिखपुल, व्हीनस कॉर्नर, खानविलकर पेट्रोल पंप येथे रस्त्यावर पाणी साचल्याने लोकांची तारांबळ उडाली. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पावसाचे शिरले. तासाभराच्या मॉन्सूनपूर्व पावसाने शहर तुंबले. मग पावसाळ्यात शहराची अवस्था काय होईल, याचा अंदाज आला. कोल्हापूर प्रशासनाने आता तरी जागे होऊन पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून कामे करावीत. उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचा सूर नागरिकांनी धरला आहे. पण, नागरिकांच्या समस्या समजून घेईल, ती कोल्हापूर महानगरपालिका कसली असंच चित्र पाहायला मिळतं आहे.

कोल्हापुरात झालेल्या पावसानंतर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पालिका आयुक्तांची प्रतिक्रिया

'तीन ते चार दिवसांत...' - कोल्हापुरात पाणी साचल्यानंतर महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी म्हटले की, '85 ते 90 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 10 ते 15 टक्के काम येत्या तीन चार दिवसांत पूर्ण होईल.' तर, पुन्हा कोल्हापूर तुंबणार नाही याबाबत आपण नागरिकांना आश्वासित करणार का, असे विचारण्यात आले असता आयुक्त बलकवडे यांनी यावर बोलणे टाळले आहे. यामुळे नालेसफाईचा दावा कितपत योग्य आहे, यावरतीच आता संशय निर्माण होत आहे.

हेही वाचा -Pre-monsoon work : मुंबईतील ३६७९ मॅनहोलवर संरक्षक जाळ्या; मान्सूनपूर्व कामांना वेग

ABOUT THE AUTHOR

...view details