महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kolhapur To Tirupati Daily Flight : आनंदाची बातमी.. 27 मार्चपासून सातही दिवस कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा - Kolhapur Airport

कोल्हापुरातून आठवड्यात चार दिवस सुरु असलेली कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस सुरु होणार ( Kolhapur To Tirupati Daily Flight ) आहे. कोल्हापूर विमानतळाचे ( Kolhapur Airport ) संचालक कमल कटारिया यांनी ही माहिती दिली.

विमानसेवा
कोल्हापूर विमानतळ

By

Published : Mar 15, 2022, 7:38 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूरसह, सांगली, सातारा आणि आजूबाजूच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण येत्या 27 मार्च पासून कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा सातही दिवस सुरू होणार ( Kolhapur To Tirupati Daily Flight ) आहे. कोल्हापूर विमानतळचे ( Kolhapur Airport ) संचालक कमल कटारिया यांनी ही माहिती दिली. सातही दिवस सेवा सुरू झाल्याने इथल्या नागरिकांसाठी मोठी सोय होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर विमानतळ विकासासाठी विविध कामे सुरू आहेत. शिवाय अनेक शहरांत सद्या कोल्हापुरातून चांगल्या पद्धतीने विमानसेवा सुरू आहे. त्यामुळे भविष्यात अजूनही काही सेवा सुरू होतील असा विश्वास सुद्धा कटारिया यांनी व्यक्त केला आहे.

आनंदाची बातमी.. 27 मार्चपासून सातही दिवस कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा

सध्या आठवड्यातून 4 दिवस सेवा

दरम्यान, कोल्हापुरातून तिरुपतीला आठवड्यातून केवळ 4 दिवस विमान सेवा सुरू होती. मात्र येत्या 27 मार्च पासून ही सेवा सातही दिवस सुरू होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही विमानसेवा सुरू आहे. त्याला प्रवाशांनी सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद दिला. शिवाय कोरोना काळात सुद्धा काही दिवस वगळता खूपच चांगल्या पद्धतीने ही विमानसेवा सुरू राहिली. त्यामुळेच मिळणारा प्रतिसाद आणि गरज ओळखून ही विमानसेवा सातही दिवस करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांकडून या निर्णयाचे स्वागत होताना पाहायला मिळत आहे.

भविष्यात कोल्हापुरातून अनेक शहरांना जोडण्याचे प्रयत्न

दरम्यान, सध्या कोल्हापुरातून विविध ठिकाणी विमानसेवा सुरू आहेत. कोल्हापूरातील विमानतळ येथे सुद्धा विविध कामे सुरू आहेत. धावपट्टी, विमानतळ विस्तार, नाईट लँडिंग आदी महत्वाची कामे सूरु आहेत. त्यामुळे इथले विमानतळ सुद्धा सक्षम बनणार आहे. शिवाय प्रवाशांकडून सुद्धा अजूनही काही शहरांना जोडण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी होत आहे. त्यामुळे याचा विचार करून लवकरच इतरही शहरांना कोल्हापूर पासून विमानसेवेने जोडण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details