कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः कहर सुरू केला आहे. गेल्या 24 तासात कोल्हापुरात तब्बल 34 जणांचा मृत्यू झाला. तर 816 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रविवारी दिवसभरात 787 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण कोरोनावर उपचार घेत असलेल्या बरुग्णांची संख्या 9 हजार 660 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 69 हजार 914 इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 69 हजार 914 वर पोहोचली आहे. त्यातील 57 हजार 926 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 660 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 328 झाली आहे.