कोल्हापूर -राधानगरी धरण क्षेत्रामधील धक्कादायक असा एक व्हिडिओ सध्या ईटीव्ही भारतच्या हाती लागला आहे. 'डर के आगे फिश है' असे कॅप्शन देऊन हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ व्हायरल: 'डर के आगे फिश है' - kolhapur rain viral video
व्हिडिओ मध्ये एका तरुणाला धरणाच्या स्वयंचलित दरवाजासमोर असलेल्या कट्ट्यावर एक मासा दिसतो. तो मासा घेण्यासाठी तरुण चक्क खाली उतरून त्या कट्ट्यावर जाण्याचे धाडस करतो. मासा घेऊन पुन्हा परत येतो. हा सर्व प्रकार धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडण्याच्या काही सेकंद आधी घडतो.

त्यानंतर दरवाजा उघडला आणि दरवाजातून प्रतिसेकंद १४२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाला. जर तो तरुण ज्याक्षणी त्या कट्ट्यावर होता त्याच क्षणी जर धरणाचा दरवाजा उघडला असता तर कदाचित त्याच्या आयुष्यातील तो शेवटचा मासा ठरला असता! पण हा प्रकार त्या तरुणाच्या किती जीवावर बेतला असता याचा फक्त विचार केलेला बरा. तो तरुण जेव्हा माशाला आणायला गेला त्याच वेळी जर धरणाचा दरवाजा उघडला असता तर तो तरुण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला असता. हा तरुण कोण आहे हे समजू शकले नाही. मात्र, जीवावर बेततील असे प्रकार करायला नकोत.