सहा वेळा दंड झाल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठले अन् समोर आले 'हे' वास्तव!
शाहूपुरी पोलीस शोध घेत अॅक्सेस दुचाकीस्वार अनिल कस्तुरे यांच्यापर्यंत पोहोचले. कस्तुरे याने त्याच्या नातेवाईकाच्या नावे असलेली दुचाकी आरटीओ पासिंग केली नाही. टॅक्स, विमा रक्कम भरणा करावयास लागू नये, पोलीस यंत्रणा, आरटीओ, फायनान्स कंपनीकडून होणाऱ्या कारवाईला टांग मारता यावी, यासाठी दुचाकीला (एमएच ११ सीसी ८८८७) अशा बनावट क्रमांकाची नंबर प्लेट लावून तो शहरात मिरवत होता.वाहतूक विभागाचे हवालदार सुरेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिल कस्तुरे याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावटी कागदपत्रे करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
सहा वेळा दंड झाल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठले अन् समोर आले 'हे' वास्तव!
सातारा - वाहतुकीचे सर्व नियम काटेकोर पाळत असताना वारंवार वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला त्यांना सामोरे जावे लागत होते. या प्रकारामुळे चक्रावून गेलेल्या वाहनधारकाने पोलिसांत धाव घेतली अन् अखेर त्या भामट्याच्या काॅलरपर्यंत जाण्यात पोलिसांना यश आले. अनिल महालिंग कस्तुरे (वय ३९ रा करंजे, सातारा) असे त्या भामट्याचे नाव असून त्याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली.