कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणवंत सदावर्ते यांच्या फोटोला आज जोडे मारो आंदोलन करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. जर कोल्हापूरच्या छत्रपती घरण्याशी पंगा घ्याल तर सदावर्तेला कोल्हापूरी हिसका दाखवू, अशा शब्दात कोल्हापूरकरांनी व छत्रपतीप्रेमींनी इशारा दिला आहे.
'कोल्हापूरच्या छत्रपतींशी पंगा घ्याल, तर याद राखा' अॅड. सदावर्तेच्या फोटोला जोडे मारो आंदोलन - कोल्हापूर महापौर निलोफर आजरेकर
कोल्हापुरातील सर्व धर्मियांनी आज दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत खासदार संभाजीराजे यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या गुणवंत सदावर्तेच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी गुणवंत सदावर्तेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणवंत सदावर्ते यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या बद्दलही अपशब्द वापरल्याने याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. कोल्हापुरातील सर्व धर्मियांनी आज दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत खासदार संभाजीराजे यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या गुणवंत सदावर्तेच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी गुणवंत सदावर्तेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. महाराष्ट्रात सर्वच समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहत असताना वादग्रस्त विधान करून राज्यात अराजकता माजविण्याच षड्यंत्र असल्याचा आरोप करत सदावर्ते यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा महापौर निलोफर आजरेकर यांनी निषेध व्यक्त केला.
सदावर्ते यांनी छत्रपती घराण्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी नगरसेवक जयंत पाटील, फत्तेसिंग सावंत, प्रसाद जाधव, कादर मलबारी, हेमंत साळुंखे, रमेश मोरे, जयकुमार शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या सुधा सरनाईक, सुनीता पाटील आदी उपस्थित होते.