कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा ( Kolhapur North by - election ) पोटनिडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी नगरसेवक सुनंदा मोहिते यांच्या मंगळवार पेठ परिसरातील कार्यालयात प्रचार पत्रके, पैशांची पाकिटे सापडल्याने पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना ( Action on BJP workers by police in kolhapur ) ताब्यात घेतले. हे पैसे नेमके कोणासाठी आणि मतदारांना वाटण्यासाठी होते का ? याबाबत जुना राजवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटत होते, असा आरोप केल्याने अशोक देसाई, विजय जाधव आणि संतोष माळी यांना ताब्यात घेतले आहे. यावर खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना अडकवण्याचा हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil on BJP workers kolhapur ) यांनी दिली.
हेही वाचा -दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या मानाच्या नवीन अश्वाचा फर्स्ट लूक; पाहा व्हिडिओ
सुतारमळा येथे सुद्धा कारवाई: दरम्यान, दसरा चौक येथील सुतारवाडा परिसरातसुद्धा पोलीस, तसेच निवडणूक आयोगाकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये 500 रुपयांच्या नोटांची पाकिटे मिळाली असून, याचा सुद्धा पोलीस अधिक तपास करत आहेत.