कोल्हापूर -जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत लागू केलेला बंदी आदेश अखेर शासनाने मागे घेतला आहे. नागरिकांच्या संतापानंतर अजब बंदी आदेश अखेर मागे घेण्यात आला आहे. 12 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत हा बंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली होती. त्यांनीच हा आदेश मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.
अखेर सरकारला उपरती.. नागरिकांच्या संतापानंतर बंदी आदेश मागे
पुरामुळे कोल्हापुरात मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले होते. पूर ओसरल्यानंतर प्रशासनाने जमाव बंदी आदेश लागू केला होता. मात्र, सर्व स्तरातून संताप व्यक्त केल्यानंतर सरकारने बंदी आदेश मागे घेतला आहे.
नागरिकांच्या संतापानंतर अखेर बंदी आदेश मागे
मागील 15 दिवसांपासून कोल्हापुरात पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. निम्मे कोल्हापूर पाण्यात होते. पूर ओसरल्यानंतर मदतकार्य मोठ्या ताकदीने सुरू आहे. असे असताना शासनाने बंदी आदेश कसा काय लागू केला? लोकांच्या अशा अनेक प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर शासनाकडून तात्काळ बंदी आदेश मागे घेतला आहे.