कोल्हापूर -बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांचे संपूर्ण देशात करोडो चाहते आहेत. मात्र या दोघींना कोल्हापुरातील एका मेहंदी आर्टिस्ट महिलेने भुरळ पाडली आहे. कोण आहे ही महिला आणि त्यांनी असे काय केले आहे, ज्याने या दोन्ही अभिनेत्री तिच्या चाहत्या झाल्या आहेत, पाहा हा विशेष रिपोर्ट
कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली येथे राहणाऱ्या मेहंदी आर्टीस्ट सोनाली वाघरी या गेल्या काही वर्षांपासून महाद्वार रोड येथे नोव्हेल्टी आदी वस्तूंचा स्टॉल चालवतात. आपला हा व्यवसाय चालवतच त्या मेहंदीचे तसेच अनेक इंग्लिश डायलॉगचे लीपसिंग करून इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'रील' बनवत असतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. आजपर्यंत अनेक व्हिडीओ त्यांनी बनवले असून ते त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. डोक्यावर पदर घेऊन त्यांनी बनवलेल्या रील्स ना अनेकांची पसंती मिळत आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा, जॅकलिनने कौतुक केल्याने सोनाली वाघरी चर्चेत
नुकतेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा, जॅकलिन फर्नांडिसने सोनाली यांच्या व्हिडीओ ना लाईक्स केले असून स्वतः मॅसेज सुद्धा केला आहे. प्रियांका चोप्राने तर सोनाली यांचा एक व्हिडीओ आपल्या स्टोरीला पोस्ट केला होता. त्यांच्या या पोस्टनंतर सोनाली चर्चेत आल्या असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. खरंतर प्रियांका चोप्रा यांनी त्यांचा व्हिडीओ शेअर केल्याचा त्यांना विश्वासच बसत नव्हता, मात्र त्यांच्या ओळखीच्या काही लोकांनी सोनाली यांना फोन करून आपला व्हिडीओ प्रियांका चोप्रा यांनी शेअर केला असल्याने सांगितल्यानंतर त्यांनी स्वतः पाहिल्यावर यावर विश्वास बसला. जॅकलिन फर्नांडिस यांनी तर स्वतःहून सोनाली यांना मॅसेज करून आपण खूप चांगले व्हिडीओ बनवता आणि असेच लोकांचे मनोरंजन करत राहा म्हटले आहे. कधी मुंबईला आलाच तर मला भेटा असाही मॅसेज जॅकलिनने केला आहे.
इंग्लिश भाषेची आवड आणि त्यांचे व्हिडीओ